सर्वात वर

दोडक्याचे आरोग्यास फायदे -(आहार मालिका क्र – २३)

डॉ. राहुल रमेश चौधरी

आयुर्वेदात फळभाज्यांना उत्तम मानले आहे किंबहुना पालेभाज्यांपेक्षा फळभाज्यांचा वापर जास्त असावा असे आयुर्वेद माननारा आहे.त्यातल्या त्यात वेलीवरच्या फळभाजीचे स्थान वरचेच.आज आपण दोडके या वेली फळभाजीचे उपयोग पाहणार आहे,दोडके हे Ridge Gourd या नावाने देखील ओळखले जाते.यास कोशातकी असेही म्हणतात.दक्षिण भारत व पूर्व भारतात दोडक्याची भाजी जास्त लोकप्रिय आहे,पाश्चिमात्य देशांमध्ये याचा वापर फारसा केला जात नाही.दोडकी गोड व कडू अशी दोन प्रकारची असतात,त्यापैकी भाजी करीता गोडसर निवडावी.

दोडक्याचे (Ridge Gourd) आरोग्यास फायदे

१.ज्या लोकांना सतत जंत होण्याची सवय आहे त्यांनी दोडक्याची कोरडी भाजी आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी खावी.

२.मलावरोध वा मलावष्टंभ असलेल्या रुग्णांनी रात्रीच्या वेळेला दोडक्याची भाजी वापरावी,त्याआधी आले सैन्धव जीरे उकडलेला दोडका चावून चावून लाळेत मिसळून खावे.

३.शुक्र धातूच्या क्षीणतेने येणारा शारीरिक थकवा व मानसिक त्रास याकरीता दोडक्याचा वापर भाजी ,सूप या रुपात वाढवावा.

४.मुलांना,आबालवृध्दांना,कष्टकरी लोकांना शारीरिक बळ मिळवून देणारी भाजी होय

५.चव नसल्याने भूक असून देखील न जेवन जाणाऱ्यांना दोडक्याची भाजी मीठ मिरची लावून खाल्ल्यास चव येते.

६.तोंडात सतत चिकटा असतांना दोडक्याच्या वरच्या शिरा आले सैन्धव चावून चावून खावे व चोथा थुंकून टाकल्याने चिकटा कमी होवून तोंड आतून स्वच्छा होते.

७.ताप असलेल्या रुग्णास आधी म्हणजेच सुरुवातीला लंघन देवून नंतर भूक जाणवल्यावर दोडक्याची पेज,दोडक्याचा पाला रस+मध+मिरा असे मिश्रण द्यावे.

८.मुतखडा झालेल्या रुग्णांना दोडक्याचे मूळ पाण्यात उगाळून झालेले चाटण एक चमचा उपाशीपोटी द्यावा याने खडा पडतो.

९.दोडकी श्वास,ताप,खोकला,जंत,मलावष्टंभ यावर गुणकारी आहेत.

महत्वाचे………

१.दोडके(Ridge Gourd) हे थंड,गोड,कफवात वर्धक,पित्तशामक,भूक वाढवणारी,तोंडाला चव आणणारी आहेत.

२.वातुळ असल्याने थोडे जास्त तेल टाकून भाजी बनवावी

३.भाजी बनवतांना शिरा काढून घ्याव्यात

४.भाजी उकडवून मग करावी.

५.भूक जास्त मंदावली असल्यास शक्यतो खावू नये

६.आंव पडणे,वारंवार शौचास जावे लागणे या अश्या तक्रारीत खावू नये.

७.लसून,तेल,जिरे वापरूनच भाजी करावी

८.दोडकी पचण्यास थोडी जड असल्याने त्यावर योग्य तो अग्निसंस्कार करून खावीत

९.वरील सर्व प्रयोग वैद्यांच्या सल्ल्याने करावेत.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०