सर्वात वर

सुरणाचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ५ )

डॉ. राहुल रमेश चौधरी 

(Health Benefits of Suran) सुरण ही एक आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये उगवणारी कंदमूळात मोडणारी आरोग्यदायक भाजी आहे.खाजरा व बिन खाजरा असे २ प्रकार सुरणाचे आढळतात.खाजरेपणा ओळखता न आल्यास तसाच घरी आणला गेल्यास त्याचा खाजरेपणा घालवण्यासाठी त्याचे तुकडे चिंचेच्या पाण्याने धुवावे.जीर्ण आजारात तीक्ष्ण औषधांनी व आजारानंतर येणारा शक्तीक्षय भरून काढण्यासाठी सूरण खीर वापरावी.

सुरणाचे आरोग्यास फायदे (Health Benefits of Suran)

मूळव्याध या आजारात सर्वोत्तम असे या भाजीचे वर्णन आहे.सूरणाच्या पीठाची खीर या आजारात उत्तम.मूळव्याधीच्या आजारातसुरण तुकडे,कोथिंबीर,जीरे,काळे मीठ,ओवा,धने  असे एकत्र वाफाळून जेवणासोबत द्यावे याने औषधांना बळ मिळते व आजार बरा व्हायला मदत होते.

शौचास साफ न होणे,सतत गॅस होणे,भूक कमी होणे,पोटाचा आकार वाढणे अश्या वेळी सुरण भाजून रस काढावा त्यात जिरे,सैंधव,मध घालून प्यावा.

खुप कफ होणे,चिकट कफ असणे,पिवळसर कफ पडणे यावेळी सुरण तुकडे उकळवून केलेले पाणी मध टाकून प्यावे.वारंवार चाटून खावे.

तोंडाला चव नसल्यास उकडुन केलेल्या सुरणाच्या फ़ोडी, आल्याचा रस व काळे मीठ लावून खावे.

८. सुरणाचे पीठ ताकासोबत घेतल्याने अजीर्ण होणे,पोटात वात पकडणे, जंत होणे या तक्रारी कमी होतात.

५. मधुमेहाच्या रुग्णाने पुन्हा पुन्हा भुक लागत असल्यास सुरणाचे तुकडे,आले,हळद आणि बडीशेप असे मीश्रण उकडून खावे. याने चांगला परीणाम दिसतो.

  काही रुग्ण नैसर्गिक कामवासना कमी होणे, उत्साह कमी होणे,मांडी,कंबर,पोटरी दुखणे,मैथुनानंतर थकवा जाणवणे अश्या वेळी सुरणाच्या चकत्या गाईच्या तुपावर परताव्या मग त्यावर साखर टाकून खावे.

जेवणानंतर आंबट,कडवट पित्त पडणे,वारंवार उलट्या होणे,डोळ्यांची आग होणे अश्या तक्रारी असल्यास सुरणाचे पिठ शिजवून पेज तयारकरुन त्यात वेलची चुर्ण व खडीसाखर टाकून प्यावे.

उपवासाकरता साबुदाणा-बटाटा असे जड अन्न खाण्यापेक्षासुरण व्यवस्थित शिजवून खावे, याने कमी अपाय होतो.

सुरण हे भुक वाढवणारे, तोंडाला चव आणणारे,कफ व मुळव्याधिचा नाश करणारे,गुणांनी हलके व कोरडे,तुरट,तिखट, वाताचा नाश करणारे,रक्त आणि पित्ताला वाढवणारे आहे.

१०. सुरण भाजी ही कंदमुळ वर्गात सर्वोत्तम आहे. सुरणापासून तुपाची फोडणी देवून बनवलेली भाजी रुचकर असते. सुरणापासून पोळ्य़ा,पुऱ्या,शिरा,खीर,लोणचे हे पदार्थ बनवले जातात. सुरणाच्या फुलांची,पानांची व देठांची भाजी बनवली जाते.

११  सुरणाच्या कंद वापरुन त्यात विविध औषधे टाकून तयार केलेल्या गोळ्या मुळव्याधीमध्ये सर्वोत्तम असतात. त्या जवळच्याडॉक्टरांकडून घ्याव्यात.

१२. सुरणामध्ये Protein,Calcium,Phosphrous,Iron हे घटक असतात.सुरण हे Vitamin A मध्ये श्रीमंत मानले जाते.

सावधान 
१. भुक लागत नसलेली लोक,रक्तवाहीन्या फुटण्याची सवय असलेल्या रुग्णांना सुरण हितावह नाही.
२. खाजरा सुरण काही प्रमाणात गुणकारी असला तरी तोपित्तकारक व दाहकर आहे.
३. सुरणाची भाजी ही पुर्ण शिजवून खावी.कच्ची खावू नये अन्यथा पचनाचे विकार संभवतात.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र     

संपर्क-९०९६११५९३०