सर्वात वर

लॉक डाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान

मुंबई – महाराष्ट्रात काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ बघायला मिळते आहे.त्यामुळे सरकार लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करते कि काय हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी प्रशासनाला लॉक डाऊनची तयारी करण्याचे निर्देश ही दिले असले तरी आघाडी सरकार मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लॉक डाऊन ला विरोध असल्याचे मत त्यांनी जाहीर पणे नोंदविले होते. काहीवेळा पूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना मोठे विधान केले आहे. 

आपल्या मुलाखतीत राजेश टोपे यांनी सांगितले की आज तरी राज्यात निर्बंध कडक करण्याच्याच सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या बेड्सची संख्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा कमी असते तेव्हा लॉकडाउन (Lockdown) हा पर्याय नाही तर लॉकडाउन शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा लागतो. त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत. सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करतो आहोत.  आपण कुठे कमी पडतो आहोत असा भाग नाही, परंतु  जर आयसीयू आणि ऑक्सिजनच्या बेड्सचा परिणाम जाणवला तर लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागतो. पण त्याचा अभ्यास करावा लागत असून आमचा विभाग आणि मुख्यमंत्री याची चाचपणी करत आहोत. अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि जीवही वाचला पाहिजे त्यामुळे मध्यबिंदू गाठावा लागतो आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा लागतो,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.  

ते पुढे म्हणाले ज्या ठिकाणी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असते त्या ठिकाणी रुग्णांसाठी लागणारी संसाधने किती आहेत. रुग्णांची वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी रुग्णांसाठी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरजच असते. तेथे अजून काय कमतरता आहे याचे आपण मोजमाप करत असतो.लॉक डाऊन (Lockdown) हा तातडीने करण्याचा विषय नाही तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो.मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,

”लॉक डाऊन (Lockdown) हा पर्याय कुणालाच आवडणार नाही आणि कोणाला प्रिय पण नाही.असे हि ते म्हणाले.  “लॉकडाउन (Lockdown) हा तातडीने घेण्याचा निर्णय नाही हा विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध हळूहळू कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.  

रुग्णसंख्या वाढणं चिंतेचा मोठा विषय आहे. कोरोना रोखण्यासाठी लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

लसीकरणा बाबत बोलताना ते म्हणाले की, “लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण आपल्याला लसीकरणाची गती वाढवायची आहे. पात्र लोकांच्या लसीकरणासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. सामाजिक आणि राजकीय संघटनाच्या कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रावर नेत मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच धर्तीवर आपण आपल्या ४५ वर्षापुढील लोकांना बाहेर काढून लसीकरण करवून घेतले पाहिजे. यामुळे लसीकरणाची गती वाढेल असा मला विश्वास आहे. आपलं देशप्रेम, राज्यप्रेम सिद्ध करावं” असे हि राजेश टोपे यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले.