सर्वात वर

दररोज १०५ मेट्रिक टन ऑक्सिजनच्या कोटयाला मान्यता द्यावी खा.हेमंत गोडसेची मागणी

नाशिक – जिल्ह्यात होणाऱ्या आॉक्सिजनच्या (Oxygen) अपुऱ्या पुरवठ्याची खासदार खासदार हेमंत गोडसे यांनी गंभीर दखल घेत आज अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांच्यावतीने सह आयुक्त गहाणे यांची मुंबईत भेट घेतली.जिल्ह्यात कोरोनाचे पन्नास हजार रुग्ण असून ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. शासनाकडून मिळणारा पच्याहत्तर मे.टन ऑक्सिजन खूपच कमी पडत असून दररोज एकशे पाच मे.टन ऑक्सिजनच्या कोट्यास तातडीने मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी अन्न व औषध विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातल्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. विविध कोव्हिड सेंटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आज दिवसभरात खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्याकडे अनेक डॉक्टरांनी केल्या होत्या. रूग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र पाठविण्याची वेळ अनेक हॉस्पिटल प्रशासनावर येत आहे. याची गंभीर दखल घेऊन आज खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त बी. आर. गहाणे यांची भेट घेतली.

यावेळी गोडसे (Hemant Godse) यांनी ऑक्सिजनच्या पुरवठा विषयी सह आयुक्त गहाणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.जिल्ह्यामध्ये एकूण नऊ ऑक्सिजन साठवणुकीचे केंद्र असून दोन केंद्रांकडून प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते .हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होण्याचे प्रमाण अति अल्प असून शासनाकडून दररोज अवघा ८५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा (Oxygen) कोटा मंजूर झालेला आहे.पैकी प्रत्यक्ष ७५ मॅट्रीक टनच ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जातो .

आज मितीस जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये सुमारे पन्नास हजार रुग्ण उपचार घेत आहेत. शासनाकडून पुरवला जाणारा पण ७५ मॅट्रिक टन ऑक्सिजन खूपच कमी असल्याने जिल्ह्यात ऑान्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी रोज ७५ ऐवजी दररोज १०५ मेट्रिक टन ऑक्सिजनच्या कोट्यास मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी  खासदार गोडसे यांनी सहआयुक्त बी.आर. गहाणे यांच्याकडे केली आहे. यावेळी गणेश रोकडे,विजय शिंगवी आदी अधिकारी उपस्थित होते.