सर्वात वर

मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे,परमबीर सिंग यांची उचलबांगडी

मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे (Hemant Nagarale) यांची नियुक्ती केली असून विद्यमान पोलीस आयुक्त(Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh) यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.तर रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटर वरून हि माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकाने भरलेल्या कारचे प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चांगलेच भोवले आहे. NIA ने मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्या नंतर राज्यातील राजकारण पेटले होते. त्यानंतर महाविकास आघाडीला भाजपाने चांगलेच धारेवर धरले होते. 

त्याच पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh) यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे(Hemant Nagarale) यांची नियुक्ती केली आहे,परंतु परमबीर सिंग यांची बदली न करता त्यांना  निलंबित करा अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.