सर्वात वर

या १८ जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद : उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये जावे लागणार

मुंबई – अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण होम आयसोलेशन (Home Insulation) मध्ये असतांना बाहेर फिरून  सुप्रर स्प्रेडर ठरतो आहे. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं असून येथील रुग्णांना उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये जावे लागणार अशा जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे.  

राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणावर भर द्यावा. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधून दिली.

‘या’ जिल्ह्यात होम आयसोलेशन (Home Insulation) बंद’  

१) पुणे २) नागपूर ३)  कोल्हापूर ४) रत्नागिरी ५)  उस्मानाबाद ६) बुलडाणा ७)  वाशिम ८)  बीड ९)  सांगली १०)  अमरावती ११)  यवतमाळ १२)  सिंधुदुर्ग १३)  सोलापूर १४) अहमदनगर १५ ) गडचिरोली १६) अकोला १७) सातारा १८) रायगड