सर्वात वर

स्टार प्रवाहकडून महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा

ठाणे तलावपालीचा परिसर उजळून निघाला आकर्षक विद्युत रोषणाईने  

Honour of Maharashtra Police From Star Pravah
Honour of Maharashtra Police From Star Pravah

मुंबई – लोकप्रिय वाहिनी स्टार प्रवाहावर (Star Pravah) महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे.हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.  महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याला समर्पित असणाऱ्या या मालिकेच्या निमित्ताने ठाणे तलावपाली परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला. 

Honour of Maharashtra Police From Star Pravah
Honour of Maharashtra Police From Star Pravah

याप्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, खासदार राजन विचारे, स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे, निर्माते आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि नवे लक्ष्य मालिकेची सर्व कलाकार मंडळी हजर होते. ठाणेकरांसाठी तलावपाली म्हणजे फिरण्याचं आवडतं ठिकाण. नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या आकर्षण विद्युत रोषणाईचा झगमगाट ठाणेकरांनी नुकताच अनुभवला. नौकाविहार करताना मालिकेची झलक पाहाण्याचा सुखद अनुभव देखिल प्रेक्षकांना घेता आला. 

Honour of Maharashtra Police From Star Pravah
Honour of Maharashtra Police From Star Pravah

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तासऑन ड्युटी असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने विडा उचलला आहे .पोलिसांनी  साहस व चातुर्याच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची  उकल करून सांगणारी स्टार प्रवाह वरील ही कथामालिका आहे. ‘नवे लक्ष्य’ या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. गुन्हेगार शोधतांना काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल.’ 

स्टार प्रवाह  (Star Pravah) प्रस्तुत नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य नव्या रुपामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे याचा आनंद आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी. नवे लक्ष्य ही मालिका दर रविवारी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Honour of Maharashtra Police From Star Pravah
Honour of Maharashtra Police From Star Pravah