सर्वात वर

हैद्राबादी ढोकळा

बातमीच्या वर

शीतल पराग जोशी 

चणा डाळ ढोकळा आपण नेहेमीच खातो. पण ह्या पद्धतीने जर ढोकळा केला तर हा पौष्टिक पण होतो. चणा डाळ सगळ्यांना मानवत नाही. जास्तीत जास्त पौष्टिक आणि सात्विक खाण्याचा प्रयत्न करावा….. सो मस्त खा…  आणि  मस्त खाऊ घाला.

साहित्य: 3 वाटी तांदूळ, 2 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चना डाळ 3:2:1:1/2 असे प्रमाण घ्यायचे. 10 लसूण पाकळ्या,5 मिरच्या,1 इंच आले, मीठ, तिखट, हळद, खोबरे किस, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, सोडा, जिरे, मोहोरी, हिंग

कृती: प्रथम तांदूळ, मूग डाळ,उडीद डाळ, चनाडाळ स्वच्छ धुऊन 5 तास भिजत घालावे. नंतर चांगले भिजल्यानंतर ते मिक्सरला वाटून घ्यावे. खूप बारीक करू नये. इडलीचे पीठ वाटतो त्याप्रमाणे वाटावे. त्यातच आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी. मीठ घालावे. ८ तास हे पीठ कालवून झाकून ठेवून द्यावे.आज दुपारी जर पिठ दळून ठेवले असेल तर दुसऱ्या दिवशी ढोकळा करावा. 
पीठ वर फुगून पण येते. आणि थोडे आंबट पण होते. नंतर त्यात थोडे तेल आणि सोडा घालून हे मिश्रण इडलीपात्राला तेल लावून त्यात घालावे. मी इडल्या करते त्याप्रमाणे करते. तुम्हाला जर ढोकळा पात्रात किंवा ताटात लावायचे असतील तर तसेही करू शकतात. 10 मिनिटं वाफवल्यावर इडली पात्रातून हा ढोकळा काढून घ्याव्या. सगळे ढोकले ताटात मांडून त्याचे 4 भाग करावे.

फोडणी
कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहोरी घालावी. ते तडतडले की ढोकल्यावर ही फोडणी टाकावी. मग ढोकल्यावर खोबरे कीस, कोथिंबीर घालावी. परत कढईत थोडे तेल घेऊन त्यात कढीपत्ता, तीळ, मिरची, हींग,थोडे मीठ घालून मग ही फोडणी परत ढोकल्यावर टाकावी. पाणी वगैरे टाकू नये. ढोकळा खूप अप्रतिम लागतो. टोमॅटो सौस अथवा शेजवान चटणी बरोबर खाऊ शकतात.

संपर्क-९४२३९७०३३२

shital parag joshi
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली