सर्वात वर

आईस्क्रिम – (आहार मालिका क्र – १४)

डॉ.राहुल रमेश चौधरी 

सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणजे आईस्क्रिम ,आईस्क्रिम (Ice Cream) चे नाव काढताच लहान बाळापासून ते वयोवृध्द गृहस्थांपर्यंत खाण्याचा मोह आवरत नाही,त्यावेळचा त्यांचा चेहराच सांगून जातो कि त्यांचा आनंद व समाधान किती द्विगुणीत झाले आहे ते.आज काल प्रत्येक समारंभात आईस्क्रिम थाटात मानाचा तुरा रोवून मेन्यु मध्ये विराजमान असते,व ते आता अनिवार्य झाले आहे.

आज काल अनेक आईस्क्रिम च्या कंपन्या आहेत ज्या फक्त आईस्क्रिम (Ice Cream) वर अमाप पैसा कमावत आहे,आणि वृत्तपत्र,टी.व्ही यावर आपण आईस्क्रिम बद्दल वृत्तांत ऐकत असतो-वाचत असतो.आईस्क्रिम अनेक प्रकारे बनवले जाते त्यापैकी दुधापासून बनवले जाणारे आईस्क्रिम  ची माहीती आपण बघूयात.

आईस्क्रिम (Ice Cream) म्हणजे काय तर दूध व इतर पदार्थ एकत्र करून चांगले घुसळून थंड करून घट्ट करण्याची प्रक्रिया म्हणजेच आईस्क्रिम होय.दूध घुसळून थंड करून घेतले असता ते पचायला जड,कफाला वाढवणारे,शरीरातील स्त्राव वाढवणारे,स्पर्शाला,चवीला थंड-मधुर,मन व सर्व इंद्रियाना प्रसन्न करणारे असते.उष्णता कमी करणारे,तीक्ष्णपणा कमी करणारे,शरीरातील रस व रक्त धातु वाढवणारे(याबाबत आपण गेल्या लेखात सविस्तर बघितले आहे)कफाला वाढवून पित्त कमी करणारे आहे(यात खराब म्हणजेचा आयुर्वेदिय शास्त्र भाषेत साम पित्त म्हणता येईल) ,व योग्य प्रमाणात सेवन केल्यास वात दोषाला देखिल नियंत्रित ठेवते.

आईस्क्रिमचे (Ice Cream) फायदे व तोटे 

१. पित्ताच्या त्रासामुळे घसा कोरडा पडून जळजळ करत असेल तर आईस्क्रिम खाल्ल्याने तात्पुरते बरे वाटते,त्रास कमी वाटतो.

२.खूप मद्यपान,धूम्रपान,चहा-कॉफी यामुळे घसा लाल होतो-दुखतो,सारखे कफ काढावे लागते अश्या वेळी त्रासाचे कारण दूर करून आईस्क्रिम खाल्ल्याने वेदना कमी होतात.

३.सारखे सारखे तोंड येणे,जिभेची आग होणे,पाणी पिल्यावर देखील आग वाटणे अश्या वेळी अर्धी वाटी आईस्क्रिम रुग्णाने २-३ वेळा खाल्ल्याने उपयोग होतो.

४.पोट रिकामे असल्यावर पोटात,छातीत जळजळ होणे,काहीतरी गोड खाल्ल्याने बरे वाटणे,गरम पेय नकोसे वाटणे,दुपारी किंवा मध्यरात्री पोटात दुखुन जाग येणे,अश्यांनी जेवणात अर्ध्यावर आईस्क्रिम (Ice Cream) खावे व रात्री झोपताना गार दूध प्यावे याने घेत असलेल्या औषधाशिवाय अधिक फायदा मिळेल ,हा प्रयोग तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने शक्यतो करावा.

५.शुक्र धातु कमकुवत असलेल्या व्यक्तींनी आईस्क्रिम हा पदार्थ खावा याने शुक्रवृध्दि होते.

६.उलट्या होणे,आंबट-कडू पित्त पडणॆ,कोरडेपणा जाणवणे,आंबट ढेकर येणे,डोळे बंद करून बसावेसे वाटणे त्यानेच बरे वाटणे,आतड्यांची शक्ती कमी झाल्यासारखी वाटणॆ,थंड पदार्थ खाण्याची ईच्छा होणे,अश्यावेळी दूधाचे आईस्क्रिम चघचघ्ळून खाल्ल्याने बरे वाटते.

७.दुपारी जेवणानंतर दीड दोन तासांनी पोटात आग वाटून काहीतरी खावेसे वाटते त्यावेळेला दूधाचे आईस्क्रिम खावे,

८.उन्हाळा व शरद ऋतू या दोन्ही ऋतूत हा पदार्थ अमृततुल्य ठरतो.

९.शौचाला आग होणे ,कमी बांधून होणे,पिवळा दुर्गंध युक्त मळ असणे अश्यावेळी जेवणा आधी आईस्क्रिम खावे व जेवावे.

१०.पित्त वाढून रात्रीची झोप शांत लागत नसल्यास आईस्क्रिम चघळून चघळून खावे याने मेंदूवरील ताण कमी होतो.व शांत झोप लागते,श्रम दूर होतात. 

निषेध

१.कफाचे विकार व प्रकृती असलेल्या लोकांनी आईस्क्रीम खावू नये.

२.वसंत ऋतुत हा पदार्थ खाणे टाळावे.

३.सर्दी ,खोकला,श्वास लागणे,मधुमेह ,अंगावर सूज येणे,अजीर्ण,भूकेची जाणीव न होणे अश्यांनी आईस्क्रिम टाळावे.

४.रात्री खाणे टाळावे.

५.पोटात गॅस पकडून आव पडत असल्यास निषिध्द

६.जुलाब होत असल्यास निषिध्द

७.फळे टाकून बनवलेली आईस्क्रिम चुकूनही खावू नये याने त्रास होतो. 

८.मांसाहार विशेषत: मासे खाल्ल्यावर आईस्क्रिम खावू नये याने विविध त्वचाविकार बळावतात.

९.दातांचे,कानाचे,नाकाचे विकार असल्यास टाळावे

१०.खराब म्हणजेच साम पित्तामुळे पित्त विकार असल्यास सर्वथा टाळावे अथवा वैद्य सल्ला घ्यावा

(विशेष सूचना – वरील सर्व उपाय वैद्य सल्ल्याने करावे.)

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी 


संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०