सर्वात वर

रेखा जरे हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी बाळ बोठेला अटक

मुंबई- अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जारे हत्या प्रकरणातील (Rekha Jare Murder Case)प्रमुख सूत्रधार बाळ बोठे याला आज सकाळी अहमदनगर पोलिसांनी हैदराबादमधून ही अटक केली आहे. बाळ बोठे गेल्या ३ महिन्यापासून फरार होता. हैदराबाद येथून बाळ बोठेला अटक करताना पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या तिघांना देखील अटक केली त्यात त्याच्या वकिलाचा हि समावेश आहे. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावं पोलिसांना मिळाली आहेत. यात एका महिलाचाही समावेश आहे.पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.  


यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोन मारेकऱ्यांनी निर्घृण हत्या केली होती.या घटनेनंतर पोलिसांनी  दोन दिवसांत रेखा जरेच्या मारेकऱ्यांसह पाच आरोपींना अटक केले. मात्र रेखा जरेच्या हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे फरार होता. विविध पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. अखेरीस त्याला आज सकाळी हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे