सर्वात वर

बलकवडे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

भगूरसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी उभारले कोविड केअर सेंटर

नाशिक : कोरोना रुग्णांना उपचाराच्या सुविधा मिळणे दिवसेंदिवस बिकट झाले आहे. त्यामुळे वीस हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या भगूरसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी स्वतःच्या जागेत कोविड सेंटर (Covid Care Center) उभारले आहे.झेप फाऊंडेशन, महाराष्ट्र शासन – आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषद नाशिक जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्षा  प्रेरणा बलकवडे यांचे प्रयत्नातुन उभारलेले बलकवडे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष  कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे व विधानसभाध्यक्ष सोमनाथ बोराडे यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 

गेल्या १ वर्षा पेक्षा जास्त दिवसांहुन अधिक काळ होऊन गेल्यानंतर कोरोना सारख्या भयंकर आजाराने लोक पुन्हा त्रस्त व्हायले लागले आहेत, ह्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असुन कोरोना झाल्यानंतर कुटुंबियांपासुन विलगीकरणात राहणे कठिन होत आहे.भगुर शहराची लोकसंख्या वीस हजार असुन भगुर नगरपालिकेचा दवाखाना आहे. मात्र त्यात पुरेशा सुविधा नाहीत. नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे आर्थीकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण देवळाली कॅन्टोनमेंट तसचे महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात अनेकांना बेड उपलब्ध नाहीत. अनेक रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. यातील अनेक कोरोनाग्रस्त भगुरला सार्वजनिक ठिकाणी फिरतांना दिसतात. त्यातून शहरात रुग्ण वाढण्याचा धोका आहे. 

Inauguration of Balkwade Covid Care Center

अश्यातच मध्यमवर्गीय व गरिबीत असलेल्या रुग्णांना हाॅस्पिटल मध्ये गर्दी अभावी बेड मिळत नसल्याचे लक्षात घेवुन सौ. बलकवडे व त्याच्या कुटुंबियांनी बलकवडे क्रिडा संकुल येथे  ५० बेडचे कोविड सेंटर (Covid Care Center) उभारण्याचा विचार केला व समाजहिताचे काम म्हणुन पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या माध्यमातुन तातडीने  मान्यता देखील मिळवली. ॲड गोरखनाथ बलकवडे यांच्या मार्गदर्शनाने सुसज्ज असे कोविड केअर सेंटर (Covid Care Center) फेसबुक लाईव्ह द्वारे लोकार्पण होऊन, प्रत्यक्षात रुग्णांच्या सेवेसाठी खुले देखील झाले. उपचारासाठी डॉ.पवन चौहान, डॉ. निखिल देसले यांच्यासह ६ नर्सेस उपलब्ध असून प्राथमिक स्वरूपात लागणारी सर्व औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. या केंद्रासाठी अजुन २ डॅाक्टर लवकरच जोडले जाणार आहेत. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक सादर करत असताना सौ. प्रेरणा  बलकवडे यांनी हे कोविड सेंटर(Covid Care Center) लक्षणं नसणार्या मात्र कोविड पॅासिटीव्ह रुग्णासाठीचे असुन  ह्या बलकवडे कोविड केअर सेंटर ची  पुर्ण रचना व व्यवस्था समजावुन दिली, ह्यात त्यांनी मनोरंजनाची सुविधा, रुग्णांना विरंगुळा म्हणुन ठेवलेले बैठे खेळ जेवण इ. सर्व गोष्टी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेसमोर ठेवल्या. या सेंटर वर रुगणांना सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

सदरचे कोविड केअर सेटर (Covid Care Center) उभारत असताना भगुर वासियांची साथ व वैद्यकिय सेवा पुरविणारे डॅाक्टर व इतर कर्मचार्यांची साथ मिळाल्याने ही जनतेची सेवा लवकरात लवकर करण्यास आम्ही सज्ज झाल्याचे सौ. बलकवडे यांनी यावेळी सांगितले.

ह्या कार्यक्रमास प्रत्यक्षात  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, विशाल बलकवडे, जेष्ठ नागरीक संघटनेचे आध्यक्ष दादासाहेब देशमुख, जि. प नोडल ॲाफीसर कृष्णा बाविसकर, डॅा पवन चव्हाण , डॅा संजय जाधव, आसाराम शिंदे, मुन्ना अनसारी, महेंद्र काळे, मयुर चव्हाण , ओम रहाणे व उदघाटन सोहळा फेसबुक लाईव्ह करण्यात आला. 

Inauguration of Balkwade Covid Care Center