सर्वात वर

भारताला आता अंतराळातून शत्रूवर नजर ठेवणे शक्य

बातमीच्या वर

ISRO PSLV C49 : इस्त्रोकडून ऑब्जर्व्हेशन सॅटेलाईटचं प्रक्षेपण

श्रीहरीकोटा – कोरोना संकटामुळे तब्बल ८ महिन्याच्या कालावधी नंतर इस्रो पुन्हा एकदा आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नवा इतिहास रचला आहे.शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी इस्रोने एओएस-०१ म्हणजेच अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण केलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे प्रक्षेपण आज ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजू २ मिनिटांनी करण्यात येणार होते. मात्र श्रीहरिकोटा येथे पाऊस सुरू असल्यानं प्रक्षेपण १० मिनिटे  लांबलं होते. 

एओएस-०1 (EOS-01) या उपग्रहामुळे सद्याच्या तणावाच्या काळात शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी शक्य होणार आहे.भारत चीन तणाव वाढला आहे तर पाकिस्तानातून सुरू असलेली घुसखोरी अद्याप थांबलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर या सॅटेलाइटचा चांगला उपयोग होणार आहे. याशिवाय कृषी, भूविज्ञान. समुद्र किनाऱ्या याबरोबरच अन्य क्षेत्रातही सुरक्षा मजबूत करण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग होईल.याच्या सिंथेटिक अपर्चर रडारच्या माध्यमातून दिवसा व रात्रीच्या वेळी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. हा उपग्रह ढगांचे अडथळे असतानाही त्याला भेदून चांगल्या प्रतीचा फोटो घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे लष्कराला याची मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली