सर्वात वर

शेव भाजी

शीतल पराग जोशी 

शेव भाजी करण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी जाड शेव वापरतात. कोणी बारीक शेव वापरतात.अनेक धाब्यावर  शेव भाजी (Shev Bhaji) खूपखुप छान मिळते तशीच शेवभाजी आपण घरी देखील करू शकतो. अशी ही खान्देशी पद्धतीची शेव भाजी करायची ना मग. मस्त झणझणीत.

साहित्य : (Shev Bhaji) 1 मोठा कांदा, 1 खोबरं वाटी छोटी, 10 लसूण पाकळ्या, 2 चमचे आले किस, 3 चमचे तिखट, 3 चमचे गोडा मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 टीस्पुन हळद, हिंग, जिरे, मोहोरी, तेल, मीठ, जाड शेव

कृती : 1 मोठा कांदा गॅसवर भाजायला ठेवावा. खोबऱ्याची वाटी पण गॅसवर ठेवून भाजावी. खूप काळी करू नये. नंतर कांद्याचे वरचे साल काढून घ्यावे. भाजलेल्या खोबऱ्याचे काप करावे. तुम्हाला असे करायचे नसेल तर कांदा चिरून आणि खोबरे किसून तव्यावर भाजू शकतात. 
जिरे, कांदा, खोबरे, लसूण, आले,तिखट, दोन्ही मसाले मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यावे. नंतर त्यात पाणी घालून पेस्ट बनवावी. हा झाला मसाला तयार. नंतर 4 चमचे तेल घ्यावे.भाजी किती हवी त्यानुसार तेल घ्यावे. तेल तापले की त्यात जिरे, मोहोरी, हिंग घालावे. मग हा वाटलेला मसाला घालावा. तो तेल सुटेपर्यंत चांगला परतवावा. हा मसाला खूप परतवणे महत्वाचे आहे. चांगला मसाला झाला की त्यात पाणी घालावे. तेल सुटले की त्यात पाणी घालावे.  भाजी किती जणांना करायची त्यानुसार कांदा, खोबऱ्याचे प्रमाण घ्यावे. जास्त करायची असल्यास 2 कांदे घ्यावेत. पाणी चांगले उकळले की त्यात मीठ घालावे. मस्त लालबुंद रस्सा तयार झाला.मग गॅस बंद करावा. जेवायला लगेच बसायचे असल्यास त्यात 2 वाटी जाड शेव घालावी. मग ती शेव (Shev Bhaji) छान मुरते. 


मग गरमा गरम भाकरीबरोबर, गरम भाताबरोबर मस्त तर्रीदार भाजी खावी. त्याबरोबर मस्त उडीद पापड, कांदा, काकडी, लिंबू खावे. काहीजण ग्रेव्ही दाट होण्यासाठी त्यात थोडे चना डाळीचे पीठ घालतात. पण कांद्याचे  आणि खोबऱ्याचे प्रमाण वाढवले की ग्रेव्ही दाट होते.

संपर्क-९४२३९७०३३२ 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी