सर्वात वर

झटपट उत्तप्पा

शीतल पराग जोशी 

Indian Recipe Instant Uttappa – आताच्या काळात, घरच्या पदार्थापासून घरच्या घरी पौष्टिक उत्तप्पा तयार होतो. चीज ऑपशनल आहे. हवे असल्यास घालावे. अजून पौष्टिक ता वाढवायची असल्यास गाजराचा किस घालू शकतात. मस्त गरमागरम घरचे आणि ताजे अन्न खा.

साहित्य-दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी बेसन अथवा तांदुळ पीठ, 1 वाटी ताक, 1/2 टीस्पून सोडा, मीठ, तेल, चीज 1 cube, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो, आले,मिरची, कोथिंबीर , लसूणपेस्ट करावी. 

कृती : रवा, तांदूळ पीठ अथवा बेसन, ताक, मीठ घालून चांगले भिजवून घ्यावे. आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी.त्यात सोडा घालून 20 मिनिटे ठेवुन द्यावे. तोपर्यंत कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. कोथिंबीर चिरून घ्यावी.

नॉनस्टिक तवा गरम झाला की त्यावर थोडे तेल ब्रशने लावावे. त्यावर हे मिश्रण घालून जाडसर पसरावे. वर कांदा, टोमॅटोचे मिश्रण घालावे. कोथिंबिर घालावी.वर झाकण ठेवावे. वाफ आली की उत्तप्पा उलटून घ्यावा. दोन्ही बाजूने उत्तप्पा चॅन लाल झाला की त्यावर चीज किसावे. मस्त गरमागरम सर्व्ह करावे. सॉस  अथवा, शेजवान चटणी बरोबर खाऊ शकतात.(Instant Uttappa )

संपर्क-९४२३९७०३३२ 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी