सर्वात वर

रुचकर आप्पे

रेखा केतकर 

Indian Recipes (Ruchkar Appe)

साहित्य- २ वाट्या तांदूळ ,१ वाटी उडदाची डाळ, १ टेबलस्पून  मेथी दाणे, छोटी वाटी पोहे ,पाव वाटी फरस  बी  ,पाव वाटी बारीक चिरलेले गाजराचे तुकडे,एक वाटी बारीक चिरलेला कांदा, २ मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे,  पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर . 

कृती- आप्पे तयार करण्यासाठी प्रथम तांदूळ आणि डाळ ५ तास भिजत घालावे तांदुळातच पोहे आणि मेथी हि भिजत घालावी , भिजलेली डाळ मिक्सर मध्ये वाटून  घ्या त्या नंतर तांदूळ वाटून घ्या ,त्या नंतर दोन्ही मिश्रण एकत्र करून  ते मिश्रण २ तास झाकून ठेवा ,२ तसा नंतर त्यात गाजर ,फरस बी, कांदा मिरच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ घालावे त्यात १ छोटा टेबलस्पून खायचा सोडा घालावा त्या नंतर मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. आप्पे पात्राला तेल लावून आप्पे तयार करावे.तयार झालेले रुचकर आप्पे(Ruchkar Appe) सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे .. 

चटणी 

साहित्य- १ वाटी खोवलेला नारळ, ३ किंवा ४ हिरव्या मिरच्या ,पाव वाटी कोथिंबीर ,३ टेबल स्पून चण्याच्या डाळ्या,साखर मीठ चवी नुसार छोटा तुकडा आले,३ टेबलस्पून दही,१ छोटा टेबल स्पून जिरे,

कृती-वरील  सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक  वाटून घेऊन त्याला वरतून १ टेबलस्पून मोहरी हिंग कढीपत्ता २ लाल सुक्या मिरच्यांची फोडणी द्यावी आणि हि चटणी अप्प्या सोबत सर्व्ह करावी. 

संपर्क-९००४६५७४९६