सर्वात वर

Infinix चा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च

(Infinixs TV) टीव्ही पाहण्याचा सुरक्षित अनुभव: बेझललेस एफएचडी स्क्रीन आणि टीयूव्ही राइनलँड सर्टिफिकेशनची सुविधा 

मुंबई: बाजारात स्मार्ट फोन क्षेत्रात यशस्वी प्रवेश केल्यानंतर ट्रान्शन ग्रुपचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड असलेल्या इन्फिनिक्सने स्मार्ट टीव्हीची (Infinixs TV) सिरीज लाँचसाठी सज्ज केली आहे. ‘इन्फिनिक्स एक्स१’ असे या सिरीज चे नाव आहे. हे बहुचर्चित अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही ३२ इंच व ४३ इंच प्रकारात येतात. हे टीयूव्ही राइनलँड प्रमाणित उपकरण असून त्यात ब्लू लाइट वेव्हलेंथवर नियंत्रण ठेवले जाते. जेणेकरून ग्राहकांना टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक चांगला येतो. 

१८ डिसेंबर पासून (Infinixs TV) हा टीव्ही फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहेत ३२ इंची टीव्हीची किंमत ११,९९९ तर ४३ इंच १९,९९९ रुपये आहे.‘इन्फिनिक्स एक्स१’ सिरीजच्या टीव्हीमध्ये सुपर नॅरो बेझल असून यामुळे टीव्हीला दर्जेदार लुक येतो. तसेच टीव्ही बघण्यासाठी उत्कृष्ट अनुभवासाठी सर्वोच्च स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर प्रदान केले जाते. एपिक 2.0 इमेज इंजिन तुमची एकूणच पिक्चर क्वालिटी वाढवण्यासाठी अल्गोरिदमचा वापर करते. हुबेहुब पिक्चर क्वालिटी देण्याकरिता तसेच ब्राइटनेस, रंग, कॉन्ट्रास्ट, स्पष्टपणा वाढवून मिळतो.इनफिनिक्स एक्स१ या सीरीजचा टीव्ही इन-बिल्ट बॉक्स स्पीकर्ससह येतो. 

याद्वारे सर्वोच्च बेस इफेक्टसह उत्कृष्ट साउंडचा अनुभव येतो. २४ व्हॉट्स बॉक्स स्पीकर्सपर्यंत डॉल्बी ऑडिओचे हे मिश्रण असून, याद्वारे समृद्ध, स्पष्ट, शक्तीशाली असा सभोवतालच्या वातावरणाचा ध्वनी ऐकू येतो. या सिरीजमधील दोन्ही अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही पॉवरफुल मिडियाटेक क्वाड कोर प्रोसेसरसोबत तसेच १ जीबी रॅम आणि ८ जीबी रोमसह उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, युट्यूब इत्यादी आवडत्या व्हिडिओ अॅपसोबत अखंड कनेक्ट ठेवण्यासाठी इन्फिनिक्स स्मार्ट टीव्हीमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट सुविधा देण्यात आली आहे.याद्वारे पर्सनलाइज्ड आणि हँड्स-फ्री अनुभवाकरिता गुगल असिस्टन्सदेखील कनेक्ट होण्याची सुविधा आहे. 

इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ श्री अनिश कपूर म्हणाले, “कोव्हिड-१९च्या काळापासून टीव्ही पाहण्याच्या वेळात लक्षणीय वाढ झाली असल्याने इन्फिनिक्सने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवर काम करण्याचे ठरवले. ग्राहकांनी दिलेल्या किंमतीचे उत्कृष्ट प्रोडक्ट प्रदान करणे हे आमचे प्रमुख तत्त्व आहे. आम्हाला नव्याने लाँच झालेल्या स्मार्ट टीव्ही (Infinixs TV) सीरीजचा वेगळाच ठसा उमटवायचा आहे.” असे हि त्यांनी सांगितले.