सर्वात वर

IPL 2020 Final : मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय

दुबई: IPLच्या १३ व्या हंगामात मुंबई इंडियन्स ने दिल्ली कॅपिटल्सवर विक्रमी विजय मिळवला आहे. मुंबई संघाचे हे पाचवे विजेतेपद असून IPL च्या इतिहासात अन्य कोणत्याही संघाला अशी विक्रमी कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये या हंगामात चार वेळा लढती झाल्या चारही लढती मुंबईने जिंकल्या.दिल्लीला एकाही सामन्यात त्यांचा पराभव करता आला नाही.IPLमध्ये आपणचं राजे असल्याचं मुंबई ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 

रोहित शर्मा आणि ट्रेन्ट बोल्ट हे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. दिल्लीने ठेवलेल्या १५७ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने ५१ बॉलमध्ये ६८ रन करत मुंबईचा विजय अधिकच सोपा केला. पण त्याआधी दिल्लीला १५६ रनवर रोखण्यात बोल्टने मोलाची भूमिका बजावली. बोल्टने ४ओव्हरमध्ये ३० रन देऊन ३ बळी घेतले