सर्वात वर

Jammu-Kashmir : दहशतवादी आणि सैन्यांत चकमक ४ दहशतवादी ठार

बातमीच्या वर

जम्मू-आज पहाटे जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मध्ये दहशतवादी व सैन्यांत जोरदार चकमक झाली.या चकमतीत चार  दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना  यश आले आहे. जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी येणार याची खबर सैन्यदलाला मिळाल्या नंतर वाहनांची तपासणी सुरु होती नगारोटा  जवळील बान टोल नाक्याजवळ ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले असून चार जवान जखमी झाले आहे. 

या चकमकी नंतर जम्मू श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला . मिळालेल्या माहिती नुसार हे चार दहशतवादी जम्मू-श्रीनगर मार्गाने काश्मीर कडे निघाले होते. या बाबत अधिक तपास सुरु आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली