सर्वात वर

जान्हवीच्या आयुष्याला मिळणार वेगळं वळण !

‘बायको अशी हव्वी’ २२ जुलै विशेष भाग रात्री ८.३० वा

मुंबई : कलर्स मराठीवरील बायको अशी हव्वी मालिकेमध्ये जान्हवीसमोर खूप मोठं आव्हान येऊन ठाकलं आहे. प्रत्येक मुलगी खूप स्वप्न घेऊन सासरचं माप ओलांडते आणि जोडीदारावर असलेल्या विश्वासाने नव्या आयुष्याची सुरुवात करते. पण जर जोडीदारानेच विश्वासघात केला तर ? जान्हवी आणि विभासचं लग्न जुळण्या आधीपासून विभास आणि राजेशिर्के कुटुंब जे सत्य जान्हवी आणि तिच्या परिवारापासून लपवत होते ते आता अखेर जान्हवीसमोर आले आहे.

विभासने तिच्यासमोर याबाबत कबुली देखील आहे. राजेशिर्के कुटुंब आणि विभासने जो चांगुलपणाचा मुखवटा घातला होता तो आता उतरला आहे. हे सत्य समोर आल्यावर जान्हवीच्या आयुष्यात पुढे आता काय घडेल ? हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागून राहली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीने विभासला सांगितले आहे, हे घर माझे आहे, आणि माझं घर सोडून मी कुठेही जाणार नाही. मी इथल्या माणसांच्या धारणा आणि हे घर बदलून टाकणार, आणि तूच म्हणशील “बायको अशी हव्वी”.

जान्हवीने आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला आहे. हे सत्य समोर आल्याने विभास जान्हवी एकमेकांपासून दूर होतील की विभासने खोटं मान्य केल्याने नातं जुळेल ? जान्हवी दिलेला शब्द कसा पूर्ण करेल ? कोणकोणती आव्हान तिच्यासमोर येतील ? जान्हवीच्या आयुष्यात पुढे काय घडेल ? आणि ती कसा यातून मार्ग काढेल जाणून घेण्यासाठी बघा २२ जुलैचा विशेष भाग रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर.