सर्वात वर

पुन्हा त्याच जोशात येत आहे’कारभारी लयभारी’ !

विरुचा राजकारणातील प्रवेश बेतेल का त्याच्या जीवावर ? प्रियांका बनवू शकेल का राजवीर ला गावचा कारभारी ?

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय, लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर आलेले निर्बंध, यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी, यामुळे ‘कारभारी लयभारी’ (Karbhari Layabhari) मालिकेने थोडा विराम घेतला होता. पण झी मराठी (Zee Marathi) वरील आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.

राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. “डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी…!”(Karbhari Layabhari) हे गाणं विशेष गाजलं. या मालिकेच्या निमित्ताने ‘अनुष्का सरकटे’आणि ‘निखिल चव्हाण’ ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेचं कथा तेजपाल वाघ यांची असून ‘देवमाणूस’ ह्या मालिकेचे संवाद लेखक विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे. काकी वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवते ते पाहून पियू ठरवते की या घरात त्या दोघांना त्यांचा मान मिऴवून द्यायचा, राजवीर चे वडील जसे त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात आणि राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम करावं यासाठी प्रियांका विशेष प्रयत्न करताना दिसणार आहे. पण सक्रिय राजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना? “कारभारी लयभारी” (Karbhari Layabhari)सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७. वा.रसिक प्रेक्षकांना झी मराठीवर (Zee Marathi) बघायला