सर्वात वर

कटोरी चाट

शीतल पराग जोशी 

कडधान्य मुले खात नाहीत. पण चाट म्हटले की मस्त खातील. त्यात प्रोटीन भरपूर असते.चाट म्हटले की तोंडाला पाणी सुटते ना. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पाणीपुरी, चाट आवडतेच. मग करून बघा ना घरी कटोरी चाट (Katori Chaat) आणि सगळे जण भरपूर खा.

साहित्य : कटोरीसाठी (Katori Chaat) :1 वाटी मैदा, 1/2 टीस्पून मीठ, 1 टीस्पून साजूक तूप किंवा लोणी

चाट : 2 वाटी  मूग, मसूर, मटकी, 1 वाटी कांदा, 1 वाटी बारीक शेव, मीठ


चटणी : 1/4 वाटी चिंच, 1 वाटी गूळ, 1/2 वाटी खजूर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून तिखट, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून मीठ


हिरवी चटणी : 3 मिरच्या, थोडी कोथिंबीर, 15 पुदिना पानें, मीठ, लिंबू, 2 टीस्पून  खारी बुंदी


कृती : प्रथम मैदा घेऊन त्यात तूप आणि मीठ घालून घट्टसर भिजवून घ्यावे. नंतर हे पीठ झाकून ठेवावे. त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. नैवेद्याची वाटी कव्हर होईल अथवा थोडी मध्यम वाटी घेऊन वाटीला तेल लावावे. कढईत तेल घेऊन ते तापवण्यास ठेवावे. नंतर या पुऱ्या त्या वाटीला बाहेरून चिटकवायच्या आहेत.पुऱ्या खूप जाड ही नकोत आणि खूप बारीक पण नको. वाटीसकट तेलात सोडायच्या. मंद आचेवर तळयच्या. म्हणजे मैद्याच्या कटोरी  तयार होतील

आहे कि नाही .. मज्जा. आता चिंच, गूळ, खजूर, तिखट, मीठ, चाट मसाला, जिरे हे सगळे मिक्सरमधून फिरवून घ्यावे.  नंतर हे गाळून घ्यावें. नाही गाळले तरी चालते. हिरव्या चटनीसाठी मिरची, कोथिंबीर, पुदिना, मीठ, बुंदी, लिंबू रस मिक्सरमधून फिरवून घ्यावे. खारी बुंदी टाकल्याने चटणी मिळून येते.मोड आलेली मटकी, मूग, मसूर थोडे वाफवून घ्यावे. मसूर ऐवजी तुम्ही हरभरा पण घेऊ शकतात. यात थोडे तिखट, मीठ, चाट मसाला, कांदा, कोथिंबीर घालून चांगले कालवून घ्यावे.सर्व्ह करताना एक प्लेट घेऊन त्यात कटोरी ठेवून त्यात चमचाभर मोडाचे मिश्रण घालून त्यावर गोड चटणी,  हिरवी चटणी, थोडा बारिक चिरलेला कांदा, बारीक शेव घालावी.  अप्रतिम अशी कटोरी चाट (Katori Chaat) तयार होते. तुम्हाला आवडत असल्यास उकडलेला बटाटा घालू शकतात.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२