सर्वात वर

खर्वसचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ११)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

खर्वस (Kharvas) नाव ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर वेलची,केशर ,पिस्ता लावलेला खर्वस डोळ्यासमोर उभा राहीला असेल आणि तोंडाला पाणी देखील नक्की सुटले असणार.खर्वस तसा खूप जणांच्या आवडीचा पदार्थ,काही जण त्याला नाक मुरडतात ते अपवादच…!

गाईला वासरू झाल्यानंतर म्हणजेच गाय व्यालानंतर गाईला येणारे पहिले दूध म्हणजेच स्तन्य ह्यालाच पियूष देखिल म्हणता येईल.त्यानंतर पुढे ७ दिवसापर्यंत येणारा दूधाचा भाग हा देखील पियूष च.यातील प्रथम भाग आणि ७ दिवसा नंतरचा भाग फरक म्हणजे सर्वात पहिल्या दिवशी येणारा चिक/दूध हे अतिशय घट्ट असते तर नंतरचे थोडे कमी घट्ट असते.पिवळसर पांढरट रंगाचा हा खर्वस पचायला जडच म्हणावा लागेल.

या खर्वसाच्या (Kharvas) अनेक पाककृती आज काल सोशल मीडीया वर बघायला मिळतात.सर्वात पहिले येणाऱ्या अतिशय घट्ट दूधात साखर टाकून शिजवलेला पदार्थ म्हणजे खर्वस (Kharvas)यात गूळ टाकून देखिल काहीजण तयार करतात.आज काल या गाईच्या प्रथम दूधापासून पावडर करून त्याच्या काही कंपन्या capsule बनवून मार्केट मध्ये उपलब्ध करून देत आहेत.तर लहान मुलांसाठी याच पावडर चे sachets देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरीता उपलब्ध आहेत.अश्या या खर्वसाचे आपण आरोग्यदायी फायदे व निषेध बघूयात.

खर्वसचे (Kharvas) आरोग्यास फायदे 

१) कृश म्हणजेचा बारीक व्यक्तीला यात आजाराविना बारिक असे म्हणता येईल, खर्वस व दूध द्यावे याने हळूहळू शरीर भरायला मदत होते.

२) रात्री कमी झोप लागणाऱ्या किंवा झोपच न लागणाऱ्या(यात देखिल कोणत्याही आजाराची खात्री करून घ्यावी) व्यक्तींना खर्वस दूध साखर एकत्र करून द्यावे.  

३) मैथुन क्षमता कमी होणे,वीर्यस्त्राव अति पातळ असणे,स्वप्नदोष असणे,शुक्राणुंची संख्या कमी असणे,अश्या रुग्णांना खर्वस,पत्रीखडीसाखर,विलायची,लवंग,केशर,साय जेवतांना खाल्ल्याने फायदा होतो.
४) जेवन करून देखील कधी कधी जेवण न केल्यासारखे वाटते तेव्हा विविध गोड पदार्थ खावे यात खर्वस वड्यांचा देखिल समावेश होतो.याने तृप्ती आनंद व जेवन करण्याचे समाधान मिळते.

५) ज्या स्त्रीला अंगावरचे दूध कमी येत असेल त्या स्त्रीने रोज खर्वस खाल्ल्यस बाळाला भरपूर दूध मिळते

६) मासिक पाळीत स्त्रावाचे प्रमाण कमी असल्यास जेवणात सुरुवातीला खर्वस खावा

७) बऱ्याच वेळेला,स्तन,जननांग यांच्या अपूर्ण वाढीमुळे संभोग सूख कमतरता,स्तन्य कमी येने अश्या तक्रारी येतात यात विविध औषधोपचारासह खर्वस खाल्ल्याने जननेंद्रिय व स्तनांची योग्य वाढ होवून अपेक्षित लाभ मिळतो.

८) बऱ्याच रुग्णांना वाताचा त्रास असतो,पोटऱ्या दुखणे,पॅरालिसिस च्या रुग्णांमध्ये तोंडाची एक बाजू वाकडी होणे,हात-पाय-चेहरा स्नायू आखडणे,जखडणे,डोळ्यांची पापणी उडणे,भरपूर प्रवासाने वात वाढणे,सांधे दुखणे अश्या त्रासांमध्ये खर्वस तूप साखर पोळी दुपारी जेवणानंतर खावी त्यानंतर साधरण २ तासपर्यंत काही खावू नये,पिवू नये.अपेक्षित फायदा मिळतो.

९) खर्वस हा पदार्थ रुचकर,मनाला प्रसन्नता देणारा,बलवर्धक आहे.

१०) व्यायाम कसरती करणारे,शरीर बळ कमावू इच्छिणारे ,तालमीत असणाऱ्या लोकांना यापासून लाभ होतो.

११) प्रचंड व सारखी सारखी भूक लागणाऱ्या लोकांना याने भूक मर्यादेत राहते.

निषेध व सावधानी

१) सातत्याने होणारे पित्त,उलट्या,अम्लपित्त,शीतपित्त,सर्दि,दमा,अंगावर सूज,श्वास लागणे,आमवात,कफाचे सर्व रुग्ण यांनी हा पदार्थ खाणे टाळावे.

२) वसंत ऋतुत हा पदार्थ टाळावा

३) मंदाग्नि म्हणजेच भूक कमकुवत असलेल्या रुग्णांनी खावू नये.

४) कफाचे तीव्र विकार असलेल्या लोकांनी वरील पदार्थ खाणे टाळावे   

५) अजीर्ण,रात्री खूप थंडी असता हा पदार्थ वर्ज्य करावा

६) आमवात,पोट साफ न होणे,सतत गॅस होणे,पोट फुगणे,करपट ढेकर येणे,वारंवार जुलाब होणे,आंबट पाणी होणे अश्या रुग्णांनी याचा प्रयोग टाळावा.  

७) वरील प्रयोग देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

Dr-Rahul-Chaudhari-nsk
डॉ. राहुल रमेश चौधरी 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०