सर्वात वर

किवी फ्रुट (आहार मालिका क्र – १५)

डॉ.राहुल रमेश चौधरी 

भारत फळफळावळ च्या बाबतीत समृध्द देश आहे,फळांच्या बाबतीत भारतात विविधता व विपुलता आढळून येते.सध्या वेगवेगळे रोग आढळून येत आहेत,काही आजारांवर परदेशी फळे उपयोगी पडत आहे,त्यापैकीच किवी (Kiwi Fruit) चे फळ होय.मूळचे चीनचे रहिवासी असलेले हे फळ Chinese gooseberry,Hayward kiwi,actinidia deliciosa याने देखील ओळखले जाते.

अमेरिका,न्युझीलंड,जपान,सायबेरिया या देशात याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.भारतात हिमाचल प्रदेशात किवीची (Kiwi Fruit) लागवड शास्त्रोक्त पध्दतीने केली जाते.या फळाच्या वेली द्राक्षांप्रमाणेच मांडवावर चढवतात.फळ हे रंगाने आकाराने चिकूप्रमाणेच त्यावर बारिक लव असून आत पांढऱ्या शिरा व बारिक बिया असतात.आतमधील गर हा हिरव्या रंगाचा मऊ असतो.७० ते १०० ग्रॅम वजन असलेल्या फळापासून ४२ कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते.याच्या लागवडीसाठी भरपूर पाऊस व थंड हवामान लागते. 

किवी (Kiwi Fruit) फळाची उपयोगीता माहीती आपण पाहूयात. 

.किवी फळात (Kiwi Fruit) व्हीटॅमिन अ,क,इ,क ही मिळतात,तसेच मिनरल्स लोह,ताम्र,पोटॅशिअम,मॅंगेनीज,कॅल्शिअम,मॅग्नेशिअम,सोडीअम ही मिळतात.याव्यतिरिक्त तंतुमय पदार्थ,पॅन्टोथेनिक ऍसिड,इनोसिटॉल,ग्लुटाथिऑन,सिरोटॉनिन ही घटकद्रव्ये मिळतात.मेद कमी प्रमाणात सापडतो.याचे क जीवनसत्वाचे प्रमाण बाकी फळापेक्षा जास्त सापडते.

.या फळातील ग्लुटाथिऑन घटकामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

३.इनोसिटॉल घटकामुळे मधुमेह नियंत्रण,मनाचे उदासिनत्व दूर होते.

.या फळाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते,संधीवात व दम्याची तीव्रता कमी होते.

५.कोलॉन कॅन्सर,मधुमेह जन्य ह्रद्यविकार यापासून संरक्षण  होते.

६.तंतुमय पदार्थांमुळे शरीरातील विषारे बाहेर पडतात.रक्त-मूत्र शर्करा नियंत्रीत राहते.

७.व्यायामामुळे येणारा अत्यधिक थकवा याने दूर होतो.

८.सिरोटोनिन ने अस्वस्थता निर्माण झालेली कमी होते.

९.या फळातील मिनरल्स मुळे ह्रद्य परिणामी शरीराचे आरोग्य अबाधित राहते.

१०.संशोधनातील माहीतीच्या आधारे या फळाने दमा,श्वास लागणे,रात्रीचा खोकला सर्दि हे आजार कमी होण्यास मदत झाल्याचे निदर्शनास आले आहे.

११.आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून हे फळ वात व कफ दोष शामक आहे

१२.डेंग्यु या आजारात प्लेटलेट कमी होणे वाचवण्यापासून शरीराचे  रक्षण करते 

१३.तसेच DNA चे देखील संरक्षण किवीने  होते.

निषेध

दूधासह या फळाचा वापर टाळावा.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी


संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०