सर्वात वर

नाशिकरोडला लहान मुलावर बिबट्याचा हल्ला

बातमीच्या वर

नाशिक –नाशिकरोड़ परिसरात अद्यापही बिबट्याची दहशद कायम असून आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील चेहेडी परिसरात बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे बिबट्याने हल्ला करताच आजोबांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला वीट फेकून मारल्याने बिबट्या दूर पळाला अन् सुदैवाने  चिमुकल्याचा जीव वाचला. जखमी मुलास बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

शनिवारी रात्री सातच्या सुमारास सातपुते मळ्यात बिबट्याने आयुष जयंत सातपुते (८) हा सातपुते मळ्यातील घराच्या बाहेर आजोबा नेताजी काशिनाथ सातपूते यांच्या बरोबर त्यांच्या घरातून बाहेर निघून शेजारच्या घरात जात असतांना बिबट्याने हल्ला केल्याचे पहाताच आजोबा नेताजी यांनी प्रसंगावधान राखत जवळच पडलेली वीट उचलून बिबट्याला फेकून मारल्याने बिबट्याचा हल्ला परतावून लावला. आजोबांमुळे आयुषचा जीव वाचल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी बिबट्याची भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जखमी आयुषला येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर नगरसेवक पंडीत आवारे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

जाखोरी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्या जेरबंद केला असला तरी इतर अनेक बिबटे दारणाकाठच्या गावांमध्ये आढळून येत असल्याने व वारंवार हल्ले करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली