सर्वात वर

वळणावरचं आयुष्य

पल्लवी पटवर्धन

आजवर  वेचत आलेल्या क्षणांच, आठवणींच गाठोडं कुठेतरी गहाळ झालय ……. 

गर्दीत आपलासा वाटतो तो फक्त एकांत असतो..

खूप वेळापासून शोधतीये पण सापडतच नाहिये …… 
खूप रडले , आकांत केला नंतर शांत बसले आणि डोळा लागला …

कधी कधी काही गोष्टी आपण आपल्या आंत रुजवुन घेतं आपण हक्कानं मिरवत असतो …

ज्या गोष्टी आपण आपल्या समजतो त्याला आपल्या अस्तित्वाची किम्मत असते?….  

पण त्या गोष्टी खरंच आपल्या असतात का
याचं भान ही आपण हरपुन बसतो…    
किती  काळ आपण त्या आठवणींच,  त्या क्षणांच, त्या भावनांचं ओझं कवटाळून ठेवतो….

वय हि एक अशी गोष्ट आहे कि ती प्रत्येक टप्प्यावर शिकवत परिपक्व करत समजावत असते आपल्याला 

आणि त्यादिवसानंतर दुसरा दिवस उगवल्यावर कालच्या सगळया गोष्टी विरून गेलेल्या असतात….

काही काळानंतर त्या क्षणांची तीव्रता हि संपुन जाते..

कधी कधी आयुष्य आपल्याला इतक्या वेगळ्या वळणावर आणुन ठेवतं ..

कि ज्याचा आपण कधी विचार ही केलेला नसतो….                  
सगळं काळवंडलेलं अंतराळ स्वच्छ होतं…
पकडलेलं बोटं कधीच हरवलेलं असतं एका अनोळखी वळणावर…

पण ते  जपलेले क्षण तिथेच थांबतात नकळत  ..

मागे वळुन पाहिले तर त्या बेंचवर बसुन वहीत चित्र

आपणचं रेखाटतं असतो …
कदाचित ते अमुर्त असलेही तो मनोवेदनांचा प्रवास असेल… 
त्या किना-यावर वाळुचं घर बांधत एक सुंदर स्वप्न सजवलेलं असेल..
त्या डोगंरावर त्या आठवणी कोरत कोरत
आपल्या आतल्या कोलाहलाला शांत निजवलेलं असेल..
काही प्रवाहाच्या दिशेने जात तर काही त्याच्या विरुद्ध…
काही वेळानं थोडा वेळ मूकं झालेले जीवन परत
बोलकं होऊ लागेल …..
पुन्हा ती शांतता …
एक आस पुन्हा जागी होईल नव्या आविष्कार साठी..
एक ओढ माणसाला आतल्या
गाभा-यातुन माणुस म्हणुन जगवत राहील…
विझलेली मनं परत पेट घेतील ….
वात तेवढी तेवत राहील अखंड ज्योतीत
नजर मात्र भरुन घेईल निसटलेल्या रेतीतले कण न कण…

पल्लवी पटवर्धन