सर्वात वर

नाशिकच्या साहित्य संलनाचे बोधचिन्ह ठरले !

नाशिक – नाशिक मध्ये २६ मार्च ते २८ मार्च मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह ठरले असून त्याचे प्रकाशन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

बोध चिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती या साठी राज्यभरातून  ५६ जणांनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य बनवून पाठवले. निवड समितीने श्री अनंत गोपाळ खासबारदार, कोल्हापूर यांनी बनविलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड केली. 

प्रकाशन समारंभाला म.वि.प्र.चे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ.जयंत पवार, जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, चंद्रकांत दीक्षित, मुक्ता बालिगा, किरण सोनार, डॉ.एस.के.शिंदे, आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. बोधचिन्हाचे विष्लेषण परीक्षक दत्ता पाटील यांनी सांगितले.

निवड समितीत वास्तू विशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत, कल्पक योजनाकार आनंद ढाकीफळे, लेखक दत्ता पाटील, लेखक प्राजक्त देशमुख यांनी काम केले.