सर्वात वर

लोकशाही न्युज चॅनेलच्या गुटखा विरोधी मोहिमेला यश..

नाशिक – गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या लोकशाही न्युज चॅनेलच्या(Lokshahi News Channel) गुटखा विरोधी मोहिमेला यश आले आहे..राज्यात गुटखा बंदी असतांना सुध्दा अवैध प्रकारे सुरु असलेल्या गुटखा विक्री विरोधात लोकशाही न्युज चॅनलने सुरु केलेल्या गुटखा विरोधी मोहिमेला राज्यातुन चांगला प्रतिसाद मिळाला.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, यांनी गुटखा विक्री विरोधात विधान सभेत चर्चा केली जाईल आणि राज्यात सुरु असलेल्या अवैध गुटखा विक्री विरोधत कडक कारवाई करण्याचे आश्वासन लोकशाही न्युज चॅनलच्या माध्यमातुन दिले आहे..

या सोबतच राज्याच्या पोलिस प्रशासनाकडुन देखील लोकशाही न्युज चॅनलने सुरु केलेल्या या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातुन गेल्या ३ दिवसात कोट्यावधींचा अवैधरित्या साठवणुक होत असलेल्या गुटख्याच्या विक्री विरोधात कारवाई करत या मोहिमेला साथ दिली आहे.

 त्या बद्दल लोकशाही न्युज चॅनल (Lokshahi News Channel) कडुन पोलीस प्रशासानाचे आभार मानण्यात येत आहे..तसेच राज्यातील जनतेनेही लोकशाही न्युज चॅनलच्या गुटखा विक्री विरोधी मोहीमेला भरभरुन प्रतिसाद दिलाय. या प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो असून भविष्यातही अशा विविध मोहिमा चॅनलतर्फे राबवण्यात येईल, अशी भूमिका लोकशाही न्यूज च्या व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलं.