सर्वात वर

राजकीय पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा,कारभारी लयभारी … !

बातमीच्या वर

मुंबई-झी मराठीवर राजकीय पार्श्वभूमी असलेली ‘कारभारी लयभारी’ ही नवी मालिका २ नोव्हेंबर पासून सुरु होते आहे. मालिकेत प्रमुख भूमिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाते हि जोडी दिसणार आहे.या मालिकेचा प्रोमो रिलीझ झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचे लेखन तेजपाल वाघ यांनी केले आहे. 

“डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी…!” या मालिकेच्या शीर्षक गीताला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या शीर्षक गीताला पंकज पडघन यांनी संगीत दिलं असून, शाहीर देवानंद माळी यांनी हे गीत गायलंय, तसेच या शीर्षक गीताचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे सुलोचना चव्हाणांचे चिरंजीव प्रसिद्ध ढोलकी वादक विजय चव्हाण यांनी ह्या शीर्षकगीताची तालवाद्य वाजवली आहेत.२ नोव्हेंबरपासून “कारभारी लय भारी” सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा.झी मराठीवर.रसिकांना बघता येणार आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली