सर्वात वर

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ

एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ ; गृहिणीच्या घर खर्चाचे बजेट कोलमडले 

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्य जनता परेशान आहेच त्यात आज पुन्हा घरगुती गॅसच्या (LPG) दरात २५  रुपयांनी वाढ करून सरकारने सर्वसामान्यांना पुन्हा एक मोठा झटका दिला आहे. या महिन्यात गॅस सिलेंडरचे दर वाढण्याची ही तिसरी वेळ आहे. एका महिन्यातच सिलेंडर च्या किंमती मध्ये जवळपास १०० रुपये इतकी वाढ झाली आहे. 

दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी (LPG) सिलिंडर पूर्वी पेक्षा २५ रुपये महाग झाला आहे.यासाठी आता ग्राहकांना दिल्लीत ७९४ रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ते ग्राहकांना ७६९ रुपयांच्या किंमतीला उपलब्ध होते.कोलकाता मध्ये ७९५ रु मिळणारे गॅस सिलेंडर आता ८२० रुपयाला होणार आहे. तर मुंबईत ७६९ रुपया वरून ७९४ असे दर झाले आहे.