सर्वात वर
AC Ad

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१ : महिलादिनी विद्यार्थीनी,गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी खास भेट

बातमीच्या वर

अर्थसंकल्पात विद्यार्थीनी,गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी खास भेट

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांनी महिला दिना निमित्त महिलांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्का मध्ये सवलत मिळणार आल्याचे अजित पवार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाला सुरुवात केली. 

ते आपल्या भाषणात म्हणाले  आज ८ मार्च जागतिक महिलादिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घऱाला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे,” असं अजित पवार म्हणाले.

 “तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची आज अजित पवारांनी घोषणा केली. राज्यात यापुढं कोणतंही कुटुंब घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात  एक टक्के सवलत दिली जाईल 

तसेच  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने सुरु केलेल्या योजनेतून राज्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना आपल्या गावापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणाऱ्या योजनेची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

मोठ्या शहरातील महिलांच्या सुरक्षतेतेसाठी तेजस्विनी योजने अंतर्गत आणखी विशेष बसेस सुविधा उपलब्ध होणार असल्याची घोषणा ही आजच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2021) करण्यात आली. 

बातमीच्या मध्ये
Ac square