सर्वात वर

Maharashtra : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये कपात: हे असतील नवे दर

बातमीच्या वर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात करत ९८० रुपयांऐवजी आता ७०० रु. हा दर निश्चित केल्याची आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. श्री.टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या मात्र कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी ही नागरिकांनी मास्क चा वापर करणे सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे सातत्याने हात धुवणे हि खबरदारी घेणे आवश्यक आहे . राज्याचा रुग्णवाढीचा दर हा ०.२१ इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असणाऱ्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ४५०० रुपयांवरुन आता ७०० रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन राज्य शासनाने कोरोना बाबतच्या उपाययोजना अमलात आणून निर्णय घेतले आहे.

खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवल्या त्याचबरोबर  ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझ्मा बॅगचे दर देखील निश्चित करण्यात आले. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीवजागृती देखील करण्यात आली. 

राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी सुरु            

राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हि मोहीम राबविण्यात येईल मोहीम राबवितांना मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण करण्यात येणार आहे.राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळाली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली