सर्वात वर

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द

बातमीच्या वर

(Maharashtra News Update)१२ आमदारांच्या यादीत नाशिकच्या नेत्याचा समावेश 

मुंबई- (Maharashtra News) विधान परिषदेत  नियुक्ती करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांच्या नावाची यादी महविकास आघाडीने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कडून प्रत्येकी चार जणांची शिफारीस करण्यात आली असून या यादीमध्ये नाशिकचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचे नाव आल्यामुळे नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सायंकाळी ६ वाजता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली.राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील,” असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीची संभाव्य नावे 

शिवसेना

उर्मिला मातोंडकर 

नितीन बानगुडे पाटील  

विजय करंजकर (नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख)

चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे 

राजू शेट्टी

यशपाल भिंगे 

आनंद शिंदे 

काँग्रेस

रजनी पाटील 

सचिन सावंत 

मुझफ्फर हुसेन 

अनिरुद्ध वनकर

(Maharashtra News)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली