सर्वात वर

सोमवार पासून महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरु : नवीन नियमावली जाहीर

नाशिक जिल्ह्याविषयी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण 

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण गेल्या काही आठवड्या पासून मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र  पुन्हा अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यावर भर देण्यात येत आहे. सोमवारपासून काही  निर्बंधात आणखी काही शिथिलता करण्याचा निर्णय राज्य  सरकाने घेतला आहे.अनलॉक बाबतच्या गोंधळानंतर काल रात्री उशिरा महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढली, पाच टप्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हे विभागण्यात आले असून काही जिल्हे अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे  

राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा  ही नवी नियमावली (Maharashtra Unlock) जारी केली असून . मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) या नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्या बाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे स्पष्टीकरण 

शासनाकडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेमध्ये जिल्हा व महानगरपालिका असे घटक करून त्यांच्यासाठी पाच लेवल्स निश्चित करण्यात आलेल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व एकूण वापरात असलेले ऑक्सिजन बेड्स याचे प्रमाण विचारात घेऊन आपण कोणत्या लेवलमध्ये बसतो ते निश्चित करायचे आहे. त्यानंतर त्या लेवल साठी निश्चित केलेले नियम लागू होतील.  त्यामध्ये सुद्धा स्थानिक परिस्थिती पाहून अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत. महापालिका व जिल्हा अशी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड वापरा बाबतची स्वतंत्र माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  काही असले तरी हे सर्व नियम सोमवारपासूनच लागू होणार असल्याने सध्यातरी पूर्वीच्याच नियमाप्रमाणे वीकेंड लॉक डाऊन सुरू राहील. 
– सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक

नियमावली