सर्वात वर

अभिनेता,दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

एका व्यक्तीला मारहाण व शिवीगाळ करण्याचा आरोप 

पुणे – सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या विरोधात एका व्यक्तीस मारहाण करून शिव्यागाळ करण्याच्या आरोपा खाली यवत पोलीस ठाण्यात भादविच्या कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास सातपुते या नावाच्या व्यक्तीने  तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि शुक्रवारी रात्री (१५ जानेवारी) पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून मागून येणारी  ब्रिझ्झा कार धडकली.
धक्का बसल्यानंतर मांजरेकर खाली उतरून गाडीची पाहणी करत असतांना यावेळी त्यांचा पाठीमागील गाडीमध्ये असलेले तक्रारदार कैलास सातपुते यांचा वाद झाला. त्यानंतर मांजरेकर यांनी शिवीगाळ करत आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप तक्रारदार कैलास सातपुतेने केला आहे. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या व्हायरल व्हिडिओत महेश मांजरे एका व्यक्तीला तू दारू पिऊन गाडी चालवतोस का? असे विचारताना दिसता आहेत.तक्रारदार कैलास  सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.

याप्रकरणावर प्रतिक्रिया देतांना महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar)म्हणाले, माझ्या गाडीला ज्यांच्या गाडीने धडक दिली.त्या गाडीतील तिघे जण  दारू प्यायले होते. या घटनेचा जाब विचारल्यानंतर त्यांनी माझ्याशी आरेरावीची भाषा केली. मात्र मला उशीर होत असल्याने मी तेथून निघालो. माझ्या गाडीला धडक दिल्याने माझ्या नव्या मर्सिडजचं मोठे नुकसान झाले आहे.माझ्या विरोधात त्यांनी तक्रार दिली तरी हकरत नाही. जर मला पोलिसांनी चौकशी साठी बोलवलं तर मी सहकार्य करेन असेही महेश मांजरेकर म्हणाले आहेत.