सर्वात वर

नाशिक शहरात संपूर्ण लॉकडाउन करा महापौरांची पालकमंत्र्यांकडे मागणी

नाशिक – नाशिक शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे. दररोज हजारो रुग्ण वाढता आहेत.परिणाम वैद्यकीय यंत्रणेवर येत असुन शहरातील ऑक्सीजन व व्हेंन्टीलेटर बेडची संख्या मर्यादीत आहे.त्या तुलनेत रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढत असल्याने उपचार करण्यास प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे शहरातील व्यापार काही दिवस थांबल्यास निश्चितच कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नास यश मिळणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात तातडीने लॉक डाउन (Lockdown) करा अशा मागणीचे पत्र महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठवले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात प्रशासन व पदाधिकारी सातत्याने योग्य प्रकारे कामकाज करीत आहे.शहरातील रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर , नर्स व इतर वैदयकीय स्टाफ कोरोना बाधित होत असुन त्यांना जीव गमवावा लागत आहे. सदयस्थितीत रॅपिड ऍन्टीजन टेस्ट , आरटीपीसीआर , एच आर सी टी सी तपासणीकरिता नागरिकांच्या रांगा कमी होतांना दिसुन येत नाही . त्यामुळे टेक्निशियन स्टाफवर दबाव निर्माण होउन हॉस्पिटल प्रशासन यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण झालेला आहे . शहरातील सर्वच स्मशानभूमी अहोरात्र धगधगत असुनही मृतांच्या अंत्यविधी करीता नातेवाईकांना वाट पहावी लागत आहे . याचबरोबर रेमडीसीवर व इतर तत्सम औषधे मिळविण्याकरीता नातेवाईकांची होणारी धावपळ व गर्दी हे सामाजिक प्रसारण ठरत आहे .

या लाटेत आता वृध्दांबरोबर तरुण व लहान मुले ही बाधीत होउन ते आपला जीव गमवीत आहे कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे शहरातील व्यापार काही दिवस थांबल्यास निश्चितच कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नास यश मिळणार आहे . काही दिवसांकरीता आर्थिक व्यवहार जरी थांबणार (Lockdown)असला तरी त्यात नाशिककर मात्र जगेल अशी आशा आहे . सामाजिक जबाबदारी म्हणून व्यवसाय थांबवणे हे गरजेचे व अत्यावश्यक असल्याचे मान्य महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी पत्रात नमूद केले असून. आपण जिल्हयाचे पालकमंत्री या नात्याने आपणास ही सर्व परिस्थिती ज्ञात आहेच तरीही आपणास विनंती करण्यात येते की , याबाबत तातडीने आपल्या स्तरावरुन तातडीने (Lockdown) निर्णय घेण्यात यावा . या आशयाचे पत्र माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी काल दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास पत्र देऊन शहरात लॉक डाउन करा अशी मागणी केलेली आहे.