सर्वात वर

नाशिकच्या कलावंतांच्या भन्नाट कॉमेडी “शो” ला रसिकांचा उदंड प्रतिसाद

नाशिकच्या कलावंतांचा यूट्यूब वरील हास्य मनोरंजनाचा भन्नाट शो “महाबिनडोक – एक डोकेबाज कॉमेडी”

नाशिक-Lockdown नंतर सध्या नाशिक मध्ये शूटिंगचा जोर वाढत चाललेला आहे. नाशिक मध्ये सध्या अनॆक मालिका व चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. मोठे मोठे नावाजलेले प्रॉडक्शन हाऊस नाशिक मध्ये शूटिंग करण्यासाठी उत्सुक आहेत. यामुळेच नाशिक मधील स्थानिक कलाकारांना संधी मिळत आहे. हीच गोष्ट लक्षात घेता नाशिक मध्येच.. १००% नाशिकची मनोरंजनाची निर्मिती असावी, असं काहीतरी करायचं आहे ही कल्पना आल्या नंतर संतोष सुधाकर प्रभूणे. यांनी पुढाकार घेऊन “महाबिनडोक” नावाचा कार्यक्रम सुरू केला

प्रभुणेंनी नाशिकमधील कलाकारांना मुंबई मध्ये अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेतच … पण नाशिकमध्ये राहून नाशिकसाठी काहीतरी करावं या उद्देशाने त्या संतोष प्रभुणे यांनी पुढाकार घेतला.

आपल्याला टीव्ही वर हास्य मनोरंजनाच्या अनेक मालिका आहेत . पण फक्त यूट्यूब वर अशा प्रकारचा एक ही कार्यक्रम उपलब्ध नाही. यूट्यूबवर असलेला हा मनोरंजनाचा मोठा धमाका पहिल्यांदा फुटतोय. या कार्यक्रमात नाशिकचेच सर्व कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, लेखक आहेत. खर्‍या अर्थाने ही नाशिकची मनोरंजनाची निर्मिती आहे. असे म्हणायला काही हरकत नाही.अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.. यूट्यूबवर धुमाकूळ घालतोय. दिवसेंदिवस यूट्यूब वर या कार्यक्रमाच्या लाईक वाढतांना दिसत आहे. ह्या निर्मितीला नाशिक आणि नाशिक बाहेरील सर्व मराठी रसिक प्रेक्षकांनी दाद द्यावी.. रसिकांचे मनोरंजन हाच उद्देश ठेऊन नाशिकच्या कलावंतांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. महाबिनडोक.. एक डोकेबाज कॉमेडी…या भन्नाट विनोदी कार्यक्रमाला रसिकांनी हि मोठ्याप्रमाणावर दाद दिली आहे.

निर्मिती – महाबिनडोक टीम
लेखक/दिग्दर्शक – संतोष सुधाकर प्रभूणे
गायक – अंशुमन विचारे
संगीतकर – आनंद ओक
सूत्रसंचालन – डॉ.श्वेता पेंडसे
कॅमेरा – किशोर देवरे
संकलन – किशोर देवरे, योगेश थोरात
साऊंड – पराग जोशी
कला दिग्दर्शक – गणेश सोनवणे
लाईव्ह म्युझिक – अभिजीत शर्मा आणि टिम
रंगभूषा – ललित कुलकर्णी
वेशभूषा – कविता देसाई
कार्यकारी निर्माता – प्रतीक शर्मा

कलाकार – राजेश भरत जाधव, गणेश सरकटे, भगवान पाचोरे, योगेश थोरात, महेश डोकफोडे, वर्षाराणी पटेल, अजय तारगे, लक्ष्मी पिंपळे, धनश्री क्षीरसागर, मोनिका दबडे, रूपश्री कुलकर्णी, अपर्णा क्षेमकल्याणी, नीलेश सूर्यवंशी, प्रतीक शर्मा