सर्वात वर

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत साजरी झाली दिवाळी

बातमीच्या वर

मुंबई-लॉक डाऊन नंतर सर्व काही ठप्प होते. शाळा कॉलेज ,नाट्यगृह ,सिनेमा गृहा सह मालिकांचे चित्रिकरण हि बंद होते, त्यानंतर काही महिन्यांनी या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली  शूट सुरु झाल्यापासून बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांच्या राहण्याची व्यवस्था सेटवरच करण्यांत आली होती आणि गेली ४ महिने सर्व crew सेटवरच होते. या सर्वांचा सन्मान म्हणून नवऱ्याची बायकोच्या टीम ने त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. ४ दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे सर्व मंडळी खुश झाली आहेत कारण या सर्वाना  ४ दिवस का होईना त्यांचा घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणार आहे

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील ह्या वेळेची दिवाळी सगळ्यांसाठीच थोडी वेगळी असणार आहे. शनाया राधिका मसालेची CEO झाल्यानंतरच तिच राधिकामसाले मध्ये पाहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे. राधिका – आनंद भावोजी आणि  शनाया – सौमित्र यांची भाऊबीज मालिकेत पाहायला मिळेल.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली