सर्वात वर

MG Motor India द्वारे नोव्हेंबरमध्ये ४१६३ कार विक्रीची नोंद

आत्तापर्यंतची सर्वाधिक विक्री; गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.५% वाढ 

मुंबई: एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नोव्हेंबर २०२० महिन्यात ४१६३ कार विक्री झाल्याचे नोंदविले आहे. MG हेक्टर ही भारताची पहिली इंटरनेट कार (Internet Car )असून नोव्हेंबर २०२० या महिन्यात या कारची विक्री एकूण ३४२६ इतकी झाली आहे.लॉन्च झाल्यापासून ही दुसरी सर्वाधिक मासिक विक्री आहे.हेक्टरने (Hector) या महिन्यात ४००० नवीन ऑर्डर्स मिळवून विकासाची घोडदौड कायम राखली आहे.ही वाढ गेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत २८.५% ने झाली आहे. 

ग्लॉस्टर (Gloster) ही भारतातील पहिली Autonomous लेवल १ प्रीमियम एसयूव्ही असून पाहिल्याच महिन्यात या ६२७ युनिट्स विक्री झाली. आत्तापर्यंत २५०० पेक्षा जास्त बुकिंग करून कार प्रेमींनी या गाडीला चांगला प्रतिसाद दिला आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रिक (Electric)गाडी MG झेडएस इव्हीच्या ११० कार नोव्हेंबर महिन्यात विकल्या गेल्या.

एमजी मोटर इंडियाचे विक्री संचालक राकेश सिदाना म्हणाले, “हेक्टर आणि झेडएस इव्हीसाठी सणासुदीच्या मोसमातील वाढती मागणी आणि MG Gloster चे यशस्वी लॉन्चिंग यांच्या मदतीने आम्ही नोव्हेंबर २०२० या महिन्यात मागच्या वर्षाच्या तुलनेत २८.५% वृद्धी नोंदवली आहे. विक्रीला मिळालेला प्रतिसाद डिसेंबर महिन्यातही राहील आणि ह्या वर्षाचा समारोप आम्ही या सशक्त संदेशाने करूअशी आम्हाला आशा आहे.”

MG हेक्टरमध्ये २५+ आधुनिक security measures सरसकट आहेत आणि काही विशेष फीचर्स आहेत तसेच या सेग्मेंटच्या गाड्यांच्या तुलनेत मेंटेनन्सचा खर्च कमी असण्याचे वचन ही गाडी देते. या कार-निर्मात्या कंपनीने Hi-tech electric carची मागणी वाढण्याचा अंदाज घेऊन अलीकडेच आपल्या झेडएस इव्हीच्या विक्रीचा आवाका २५ शहरांपर्यंत नेला आहे.