सर्वात वर

मिल्कशेक आरोग्यास अपायकारक की फायदेशीर !

डॉ. राहुल रमेश चौधरी 

(आहार मालिका क्र – १०)

मिल्कशेकचे (Milkshakes) नाव ऎकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल.साधारणत: पूर्वी उच्चभ्रू लोकांपासून ते उच्चमध्यमवर्गियापर्यंत प्रसिध्द असणारा हा पदार्थ आज सर्वच वर्गात आवडीने खाल्ला जातो.दिवसभरापासून रात्री उशिरापर्यंत या पदार्थांची विक्री सुरु असते, आता प्रचंड लोकप्रिय देखील आहे.या पदार्थाचा उगम आपला नाहीच आपल्याकडे शिक्रण हा प्रकार पूर्वीपासून प्रचलीत आहे. मिल्कशेक (Milkshakes) हा त्याच प्रकारातला. मिल्कशेक म्हणजे बर्फ,दूध,फळ व इतर क्रीम अथवा मिक्सिंग करिता इतर विशिष्ठ पदार्थ एकत्र मिक्सर मध्ये घुसळून तयार करून निर्माण होणार पदार्थ होय.आजकाल सगळ्याच पदार्थांचा शेक बनवला जातो.त्यात काही ठिकाणी,सुकामेवा,चॉकलेट,कोको वापरून देखिल शेक बनवला जातो.या संदर्भात आयुर्वेद (Ayurveda) काय सांगतो याचे फायदे आहेत कि  तोटे (Milkshakes are harmful or beneficial to health!) यावर आजचे सदर बघूयात.

आयुर्वेदीय (Ayurveda) विचार-

आजकाल अनेक प्रकारचे अम्लपित्त,शीतपित्त,मायग्रेन,संधीवात,आमवात.केसांचे विकार,त्वचेचे असंख्य विकार,ह्रद्याचे विकार,दातांचे-डोळ्यांचे विकार ,किडणीचे विकार ,रक्ताचे विकार,यकृताचे विकार,हॉर्मोनल imbalance ,दमा इत्यादी पहावयास मिळतात.यानिमित्त मिल्क्शेक (Milkshakes)सारख्या विरुध्द आहाराबाबत आयुर्वेद काय विचार मांडतो ते खालील प्रमाणे

१) फळ व दूध हे आयुर्वेदात सर्वथा व्यर्ज्य सांगितले असून ते विरुध्द आहारात मोडते.

२) दूध व बर्फ कदाचित कधितरी चालू शकते

३) बदाम व दूध हे मिश्रण योग्य ठरते.

३)फळामध्ये कोणतेही फळ दूधासह योग्य नाही.याणे वरील वर्णन केलेले विकार जडतात.

४)अनेक कायम सर्दि पडसे दमा असलेल्या रुग्णांमध्ये शिकरण,शेक हे प्रकार खाण्यात सापडतात.

५)अनेक त्वचारोग असलेल्या रुग्णांमध्ये फळे दूधासह खाल्लेले सापडतात.याने त्वचारोगातील पू,स्त्रावाचे प्रमाण वाढते.

६) संधीवात,आमवाताच्या रुग्णांमध्ये मिल्कशेक ने वेदना वाढतात.

७) मायग्रेन च्या रुग्णांमध्ये मिल्कशेक ने वेदना वाढतात व दीर्घकाळ टिकतात

८) अम्लपित्तच्या रुग्णांमध्ये मिल्क्शेक दिल्याने तात्पुरते बरे वाटते परंतु काही वेळाने जळजळ,उलट्या,डोकेदुखी असे त्रास सुरु होतात.

९) लहान मुलांमध्यी चष्मा लवकर लागण्याचे कारण देखील हे खूप प्रमाणात आढळते.

१०) अंगावर पित्त बऱ्याच जणांना उमटते त्यांच्या रुग्णइतिहासात बऱ्याच वेळा हे कारण सापडते.

११) खराब कोलेस्टेरॉल वाढणे,क्रिएटीनीन वाढणे,युरिक ऍसिड वाढणे अश्या रुग्णांमध्ये मिल्कशेक हे कारण सापडतेच सापडते .

१२) केस गळणे.केस पांढरे होणे इतर केसांच्या समस्या मिल्कशेकामुळे निर्माण होतात.

१३) आज काल वंध्यत्व,नपुंसकता,थायरॉईड याचे प्रमाण खूप वाढले आहे ,यामध्ये बऱ्याच रुग्णांच्या पूर्वीच्या खाण्यात हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतो.

१४) लहान मुलांच्या अंगावर पांढरे चट्टे येणे,लघवी-शौच्याच्या जागी खाज येणे,अंगावर बारीक लाल पुरळ येणे,सतत सर्दि खोकला येणे,श्वास घेण्यास त्रास होणे अश्या मुलांना या पदार्थापसून दूर ठेवावे.

१५) सोरियासिस या आजारात याचे सेवन केल्यास सर्व लक्षणांमध्ये वाढ होते.

या सर्व पदार्थाची ही थोडक्यात व काही शब्दांमध्ये मांडणी झाली.हा विषय अनुषंगाने येणारे आयुर्वेदिय विचार थट्टेचा व टिंगलटवाळीचा भाव आधुनिक शास्त्रकार मते व परिणामी सामान्य लोकांच्या मते दिसतो.पण जेव्हा याचे रुग्ण तेच स्वत: होतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायला जागा नसते एवढे तीव्र स्वरूप आजार धारण करतो.याबाबत आयुर्वेदाचा वरवर उदो उदो करणाऱ्या शासनाने विज्ञापन पत्रक काढून प्रचार प्रसार करण्याची गरज आज च्या काळात जाणवते.

कोणती फळे मिल्कशेक (Milkshakes) करीता वापरू नये-


अननस,चेरी,रास्पबेरी,गूजबेरी,स्ट्रॉबेरी,मलबेरी,प्लम,संत्री,मोसंबी,काकडी.कोहळा,डाळींब,आवळा,नारळ,फणस,केळी,चिकू,अक्रोड,कवठ.चिच,जांभूळ,अंबाडा,कैरी.महाळुंग,करवंद,ओटीचे फळ,बोरे, ही सर्व फळे या पदार्था साठी सर्वथा वर्ज्य आहेत.रोगी मनुष्यानेच काय स्वस्थ व निरोगी मनुष्याने देखील याचे सेवन सर्वथा टाळावे.त्यामुळे या विषाची परिक्षा घेवोच नये.

अपवाद

यास आयुर्वेद (Ayurveda) ग्रंथात एक अपवाद आढळातो तो म्हण्जे दुधासह आंबा.हा घरीच बनवून खाण्याचा पदार्थ आहे,बाहेरच वर्ज्य करावा.चांगला-उत्तम प्रतीचा आंबा गोड-रसाळ आंबा पिळून त्याचा रस काढावा त्यातील धागे काढून त्यात खडीसाखर,वेलची,साय,दूध हे मिश्रण एकजीव करावे व जेवणासह खावे.हे वात,पित्त दोषांना कमी करणारे.तोंडाला चव आणणारे,बळ वाढवणारे,शुक्र धातु वाढवणारे,जड आणि थंड आहे.

त्याचप्रमाणे दूध,बदाम,पिस्ता,वेलची,जायफळ,केशर हे देखील एकत्र करून घेता येते.

सूचना

विरुध्द आहार घेवू नये,सेवन करू नये त्याने वरील सर्व त्रास संभवतात.

Dr-Rahul-Chaudhari-nsk
डॉ. राहुल रमेश चौधरी 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०