सर्वात वर

कोणती दुकाने सुरू राहणार व कोणती बंद राहणार: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

नाशिक – काल महाराष्ट्र शासनाने राज्यात मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) घोषित केला.या बाबत राज्यसरकारने १२ पानांचा आदेश काढला असून त्याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. अनेकांजण वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून चौकशी करत आहेत. नक्की काय सुरु राहणार किंवा काय बंद राहणार ! शाळा बंद असल्या तरी बोर्डाच्या परीक्षांचे काय ? असे विविध प्रश्न लोकांना पडले आहेत. या बाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Mini Lockdown

जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हंटले … 

कोणती दुकाने सुरू राहणार व कोणती बंद राहणार याबाबत अनेकजण विचारणा करीत आहेत. जीवनावश्यक बाबी सोडून सर्व दुकाने मॉल मार्केट बंद राहणार आहे असे अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.जीवनावश्यक बाबी कोणत्या ते देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. खालील दोन उतारे कृपया वाचावेत त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. 

असे स्पष्टीकरण नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहे. 

आजपासून महाराष्ट्रात शासनाने मिशन “ब्रेक द चेन” लागू केले आहे. आज रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

आदेशाची प्रत