सर्वात वर

‘मिशन झिरो’पुनःश्च ऍक्शन मोडवर

महानगर पालिका व भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते शुभारंभ 

नाशिक – मिशन झिरो (Mission Zero) अंतर्गत नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आर टी पी सी आर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे या संकल्पने द्वारे मिशन झिरो व मिशन लसीकरण या अभियानाचा नाशिक महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थां द्वारे आज पासून इंदिरा गांधी रुग्णालय पंचवटी कारंजा येथे  महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

मिशन झिरोच्या (Mission Zero) माध्यमातून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे.

इंदिरा गांधी रुग्णालय यांच्या बरोबरीने मायको दवाखाना फुले नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्ह्सरूळ येथेही मिशन झिरो (Mission Zero) हे अभियान आज पासून सुरु झाले असून पहिल्याच दिवशी एकूण ४१३ अँटीजेन चाचण्या होऊन १० पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर ४०३ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. 

लवकरच नाशिकच्या सहा ही विभागातील सर्व लसीकरण केंद्रां जवळ महानगर पालिकेच्या वतीने व या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने  मिशन झिरो हे (Mission Zero) अभियान सुरु होणार आहे. या ठिकाणी लसीकरणा व्यतिरिक्त ही नागरिक येऊन अँटीजेन चाचणी करून घेऊ शकतात व त्या योगे मनातील भीती दूर होण्यास मदतच होईल व आवश्यकता असल्यास सल्ला व उपचार घेऊ शकतात त्या मुळे पुढील संक्रमण रोखण्यास हातभार लागेल.    

भारतीय जैन संघटना व इतर स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे डॉक्टर आपल्या दारी, बी जे एस मिशन : ब्लड कलेक्शन, प्लाझ्मा जीवनदायी योजना या बरोबरच मिशन झिरो नाशिक अंतर्गत २५ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे २१.०७.२०२० ते २६.०९.२०२० या कालावधीत ७५१६६ नागरिकांच्या अँटीजेन चाचण्या करून १२५९५ पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधण्यात यश मिळविले होते. तसेच स्मार्ट हेल्मेट द्वारे ०५.०९.२०२० ते २६.०९.२०२० या कालावधीत १०५१०५ नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करून १४७२ संशयित रुग्णांना शोधण्यात यश आले होते व त्यायोगे पुढे होणारे कोरोना संक्रमण थोपविण्यास मिशन झिरो ची मोलाची मदत झाली होती.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गरज लक्षात घेऊन जेष्ठ समाजसेवक, बी जे एस संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून देशभर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन च्या माध्यमातून बी जे एस मिशन ऑक्सिजन बँक कार्यरत आहे. तसेच बी जे एस, वॉटर ग्रेस व नाशिक वॉरियर्स या स्वयंसेवी संस्था पुनश्च ऍक्शन मोड वर आल्या असून महानगर पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मिशन झिरो (Mission Zero) नाशिक व मिशन लसीकरण हे अभियान सुरु केले आहे. 

शुभारंभ प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, कोरोना नोडल अधिकारी डॉ विजय देवकर आदी उपस्थित होते. 

हे अभियान यशस्वी करण्यासाठी म न पा चे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीने  मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे रामेश्वर मालानी, विनोद गणेरीवाल, बी जे एस चे ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, किरण धनराय हे परिश्रम घेत आहेत.