सर्वात वर

कोरोना महामारीच्या या संकटकाळी मनसे नाशिककरांच्या सेवेत सदैव तत्पर-अंकुश पवार

नाशिक : जागतिक कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) दुसऱ्या प्रचंड लाटेच्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा त्राण पडला आहे. प्रशासन अपुऱ्या संसाधनांसह सर्व स्तरावर या विरुद्ध लढत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी संपूर्ण ताकदीनिशी प्रशासन व जनतेच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्र सैनिक जागोजागी रुग्ण सेवेत दिवस रात्र आपल्या जीवाचे रान करून एक एक जीवन वाचविण्यासाठी धडपडत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व विशेषतः शहर अध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व विभागांतील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांवर नागरिकांना तसेच कोविड केअर सेंटर्सवर रुग्णांच्या नातेवाईकांना अल्पोपहार देऊन मानसिक आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु असून नागरिक व रुग्णांचे नातेवाईकांकडून ह्या निस्वार्थ सेवेचे मनभरून कौतुक करण्यात येत आहे. या केंद्रांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे सातत्याने चहा नास्ता, पाणी पुरविण्यात येत आहे.

मनसे सातपूर तर्फे लसीकरण केंद्रात लस घ्यायला येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत नास्ता, चहा, पोहे, पाणी वाटप चालू आहे. आज सातपूर कॉलनी दवाखाना, mico दावाखाना, ESI दवाखाना, चुचाळे गाव दवाखाना येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अंकुशभाऊ पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक योगेश भाऊ शेवरे, विभाग अध्यक्ष योगेश (बंटी) लभडे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, नाशिक शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पद्मिनीताई वारे, सातपूर विभाग अध्यक्ष आरतीताई खिराडकर, स्वागता (सोनूताई) उपासनी, बबलू ठाकूर, शाखाप्रमुख वैभव महिरे, निशांत शेट्टी, विजय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विनय नगर, भारत नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निकितेश धाकराव, स्वागता (सोनूताई) उपासनी, धीरज भोसले, अक्षय कोंबडे, पंकज बच्छाव, शेहबाज काझी, योगेश समशेर, काश्मीरा कनोजिया, रुपेश घोलप, संदिप शर्मा, आकाश आहिरे, अंकित भानुशाली, आशिष श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते.