सर्वात वर

मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण : लीलावती रुग्णालयात दाखल 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून ताप आणि खोकला येत असल्याने काल (सोमवारी दि. १९ एप्रिल ) त्यांची कोरोना चाचणी केली होती. आज त्यांचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. 

सूत्रांच्या माहीती नुसार दोन दिवसांपासून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना ताप होता.त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु केले. कोरोनाची लक्षण असल्याने अमित ठाकरे यांनी खबरदारी म्हणून स्वतःच विलगीकरण केलं होतं. दोन दिवसानंतर ताप तर गेला. मात्र, खोकला जात नव्हता, त्यामुळे डॉक्टरांनी  त्यांची कोरोना चाचणी करुन घेतली, आज दुपारी त्यांचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला. अमित ठाकरे यांनी त्यानंतर डॉक्टरांशी  बोलून लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. 

अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सह परिवारातील सर्वांनी कोरोना चाचणी केली आहे, त्यांचे रिपोर्ट उद्यापर्यंत अपेक्षित आहेत.