सर्वात वर

डॉ.अतुल वडगांवकरांना धमकी प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या संपूर्ण ताकदीनिशी डॉ.अतुल वडगांवकरांच्या पाठीशी – अंकुश पवार

नाशिक : नाशिक मध्ये कोरोना रुग्णांवर  उपचार करणारे डॉ. अतुल वडगांवकर (Dr. Atul Wadgaonkar) ह्यांना धमकी दिल्याच्या प्रकाराचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहे.असे आश्वासन शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी दिले.

जागतिक कोरोना महामारीच्या दुसऱ्या प्रचंड लाटेच्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा त्राण पडला आहे. प्रशासन अपुऱ्या संसाधनांसह सर्व स्तरावर या विरुद्ध लढत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी संपूर्ण ताकदीनिशी प्रशासन व जनतेच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्र सैनिक जागोजागी रुग्ण सेवेत दिवस रात्र आपल्या जीवाचे रान करून एक एक जीवन वाचविण्यासाठी धडपडत आहे. त्याही परिस्थितीत माणुसकीला काळिमा फासविणारे गैरप्रकार सुरु आहेत त्यातच  सिलिंडर्सचा काळाबाजार, रेमिडिसीव्हर व इतर जीवरक्षक औषंधाची साठेबाजी ,आयसीयू बेड व व्हेंटीलेटर बेडचा कृत्रिम तुटवडा अशा गोष्टी घडता आहे.असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा आरोप आहे

अनेक जागी डॉक्टर्स  व आरोग्य सेवक  देवदूत बनून एक-एक जीवन वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. अत्यंत अल्पदरात कोरोना  बाधित रुग्णांवर उपचार करून  आता पर्यंत तब्बल दहा हजारांवर  रुग्णांचे  प्राण वाचविणारे डॉक्टर अतुल वडगांवकर (Dr. Atul Wadgaonkar) हे असेच एक  देवदूत. ह्या लढ्यात रुग्णांचे प्राण वाचविण्यास  सर्वतोप्रथम आपले  कर्तव्य  मानणारे, आपल्या जीवरक्षकाच्या भूमिकेचा कधीही विसर न पडू देता गोरगरिबांच्या मदतीस धावून येणारे डॉ. वडगांवकरांना (Dr.Atul Wadgaonkar) त्यांच्याच व्यवसायातील काही व्यापारी  मानसिकतेच्या सहकाऱ्यांकडून धमकावण्याचा निषिद्ध  प्रकार घडल्याचा प्रकार समोर येत आहे.

हा प्रकार समजल्यानंतर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष अंकुश  पवार यांच्या नेतृत्वात विभाग अध्यक्ष सत्यम  खंडाळे, उपशहराध्यक्ष संतोष कोरडे, पराग भुसारी, समृद्ध  (निल) रौंदळ, गणेश शेजूळ आदी पदाधिकारी डॉक्टर अतुल वडगांवकर (Dr. Atul Wadgaonkar) ह्यांना भेटावयास गेले व त्यांनी कोरोना  महामारीच्या ह्या लढ्यात  कोणाच्याही  दबावाला  बळी न पडता त्यांनी आपले  जीवरक्षकाचे  कर्तव्य बजवावे व कुठलीही अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  पदाधिकाऱ्यांना कळवावे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या  पाठीशी आहे असे आश्वासन शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी दिले.