सर्वात वर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे तर्फे सॅनेटायझर फवारणी !

नाशिक :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नाशिक येथील प्रभाग क्रमांक २४ मधील विविध भागांत सॅनेटायझर फवारणी करण्यात आली.महाराष्ट्र सैनिक जागोजागी रुग्ण सेवे साठी धडपडत आहे. सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरीता सामाजिक जाणिवेच्या भावनेतून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज नवीन नाशिक परिसरात ही सॅनेटायझर फवारणी करण्यात आली 

MNS Sprays Sanitizer to Prevent Corona Outbreak !

नाशिक मनसे शहर अध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना जिल्हा अध्यक्ष बबन (योगेश) विष्णुपंत जगताप यांच्या आयोजनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार दिनांक २२/०५/२०२१ रोजी नवीन नाशिक येथील प्रभाग क्रमांक २४ मधील जगताप नगर, पाटील नगर, जुने सिडको, गोविंद नगर, उंटवाडी, दत्तमंदिर आदी भागांत सॅनेटायझर फवारणीची सुरुवात करण्यात आली. या वेळी तीन सॅनेटायझर फवारणी मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्याच बरोबर नवीन नाशिक भागातील जागृत देवस्थान असलेल्या पुरातन मारुती मंदिरात नाशिककरांवरील कोरोनाचे व काळ्या बुरशीच्या संसर्गाचे संकट टळो व सर्वसामान्य नाशिककरांना आरोग्य लाभो असे देवाला साकडे घालण्यात आले.

MNS Sprays Sanitizer to Prevent Corona Outbreak !

याप्रसंगी  नाशिक मनसे शहर अध्यक्ष  श्री अंकुश पवार, महाराष्ट्र नवनिर्माण  शारीरिक सेना जिल्हा अध्यक्ष बबन ( योगेश ) विष्णुपंत  जगताप, शारीरिक सेना शहर अध्यक्ष विजय आगळे, शारीरिक सेना नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अमर दरेकर, मनविसे शहर सरचिटणीस पंकज बच्छाव, रोहन जगताप,बबलू ठाकूर,प्रभागातील नागरिक श्री विष्णुपंत जगताप,पंकज जगताप,राजू कहांडळ,राहुल जाधव, विनोद जगताप, प्रवीण जगताप,साईनाथ कोल्हे, पप्पू बागुल, यश जगताप, समाधान कहांडळ, आबा शिसोदे, प्रथमेश उन्हाळे, अर्जुन जगताप आदी नागरिक उपस्थित होते.