सर्वात वर

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलणार

बातमीच्या वर

खा.अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्याला यश 

मुंबई– मुंबईत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. पश्चिम रेल्वे स्थानकावरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे (Mumbai Central Terminus) नाव लवकरच ‘नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस’ असे होणार आहे. याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहून मागणी केली आहे.

महाराष्ट्रात सध्या नामांतराच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरु आहे. अशा वेळी शिवसेनेचे खा.अरविंद सावंत यांनी पश्चिम रेल्वे स्थानकावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलावे या साठी केंद्रसरकार कडे सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यामुळे आता केंद्रसरकारने कार्यवाही सुरु केल्याचे पाहायला मिळाले असून केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी खा. सावंत यांनी पत्र पाठवले आहे.

शिवसेने कडून करण्यात आलेल्या मागणीत मुंबई सेंट्रल टर्मिनसचं (Mumbai Central Terminus) नाव बदलून नाना शंकरशेठ टर्मिनस करण्याबाबत केंद्रसकरने सकारात्मक पाऊल उचलले असून त्या बाबतचे पत्र केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना लिहिलं आहे. नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून, केंद्र सरकार याबाबत कार्यवाही करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी खा. सावंत यांना दिली आहे. 

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलावे या बाबतचा ठराव या आधी विधानसभेत हि पारित झाला आहे. हा प्रस्ताव त्यानंतर केंद्र सरकारकडे याबद्दल प्रस्ताव पाठवण्यात आला होता.जगन्नाथ शंकरशेठ हे आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होते. मराठी शिक्षणतज्ज्ञ, तसंच एक उद्योगपती होती. ते थोर समाजसेवक, आणि त्याचबरोबर पहिल्या रेल्वेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली