सर्वात वर

26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन

बातमीच्या वर

राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई:- मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील शूरवीर शाहिद झाले होते.आज या हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण झाले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस शूरवीरांना आज मुंबई पोलीस आयुक्तालय प्रांगणातील शहीद स्मारक येथे मानवंदनेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अपर्ण करुन आदरांजली वाहिली.

त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांनी देखील शहीद स्मारकास पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव (गृह) विनीत अग्रवाल, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलिस आयुक्त परमवीर सिंग  तसेच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक ऐलात शहरात उभारण्यात येणार आहे. ज्यू धर्मियांनाही या दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. ज्यू नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या इमारतींवर हल्ला करण्यात आला होता.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली