सर्वात वर

सेन्सेक्स ४५ हजाराच्या शिखरावर

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

विदेशी वित्तीय संस्थांची जोरदार खरेदी, रिझर्व बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो कोणताही न केलेला बदल आणि भारतात लवकरच करोना लसीचे वितरण होणार आणि जगातील बाजारातील मिश्र संकेत या सर्व कारणांमुळे बाजारात आज जोरदार तेजी बघायला मिळली आणि त्यामुळेच आज भारतीय शेअर बाजाराने अजून एक नवीन स्तर नोंदवला.

सकाळी बाजार जागतिक संमिश्र  संकेतांच्या आधारे SENSEX 98 अंकांनी आणि NIFTY 35 अंकांनी सकारात्मक उघडले काही काळ चढ उतार सुद्धा बाजारात दिसले परंतु 10 वाजता आर बी आय चे वित्तिय धोरण जाहीर झाले आणि त्यात अपेक्षेप्रमाणे REPO RATE 4% आणि REVERSE REPO RATE 3.50% यात कोणताही बदल करण्यात आला नाही आणि याला बाजाराने सकारात्मक घेतले त्याचाच परीणाम म्हणून आज बाजार RECORD HIGH वर म्हणजे मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX  तब्बल 447 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 124 अंकांनी वधारून नवीन RECORD HIGH वर म्हणजे 13258 ह्या पातळीवर बंद झाला ,आज खऱ्या अर्थाने BANKING व FINANCE क्षेत्रातील शेअरमध्ये मोठया प्रमाणात मागणी दिसली त्यामुळे NIFTY BANK सुद्धा 603 अंकांनी वधारून 30052 ह्या पातळीवर स्थिरावला. 

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1483 समभाग सकारात्मक होते तर 1178 समभाग नकारात्मक दिसले आणि 138 शेअरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसला नाही. 
क्षेत्रीय विचार केला तर BANK INDEX 2% ने वधारला तर METAL ,IT ,PHARAMA व FMCG 1% ने वधारलेत.बाजारातील सूत्र1 सांगत आहेत की,  बाजारात विदेशी वित्तीय संस्था ह्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहेत आणि अर्थव्यवस्था जर सुरळीत सुरू झाली तर बाजार अजून वर जाऊ शकतो परंतु वरच्या स्तरावर नफा वसुली करणे तितकेच गरजेचे आहे.

NIFTY १३२५८ + १२४

SENSEX  ४५०७९ + ४४७

BANK NIFTY ३००५२ + ६०३%


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

ADANIPORTS ४५७ + ५% 

ICICI BANK ५०३ + ५% 

HINDALCO २५२ + ४%

ULTRACEMCO ५०९० + ४% 

SUN PHARMA ५६८ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

RELIANCE १९४८ – १%

HDFC LIFE ६४३ – १%

BAJAJFINSV ९०५२ – १%

B P C L ३९२ – ०.५१%

HCL TECH ८५८ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.८९५०

सोने १० ग्रॅम         ४९२८३.००

चांदी १ किलो       ६४०००.००

क्रूड ऑईल            ३४२४.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक 


मोबईल -8888280555