सर्वात वर

नागपूर – हैद्राबाद एअर अ‍ॅम्बुलन्सचं मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मुंबई- नागपूर वरून हैद्राबादला जाणाऱ्या एयर ऍम्ब्युलन्सचे (Air Ambulance) मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यात आले. नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्बुलन्सचं उड्डाणाच्या वेळी  एक चाक खाली पडल्यानंतर विमानाला मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी वळवण्यात आले. मात्र, असे असले तरी सुदैवाने या एअर अ‍ॅम्बुलन्सचं (Air Ambulance )सुरक्षितपणे लँडिग करण्यात आलं आहे.

या विमानात (Air Ambulance) एक रुग्णासह पाच जण होते विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) झाल्या नंतर विमानातील रुग्णाला नानावटी रुगालयात दाखल करण्यात आले आहे. हे एक प्रायव्हेट जेट होतं. मुंबई विमानतळावर विमानाचं शेड्युल्ड नसल्याने त्याला काही काळ विमानतळ परिसरात आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यानंतर विमानतळावर अलर्ट जाहीर करण्यात आला आणि मग विमानाचं मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार जेटसर्व एविएशन C-90 एअर  अ‍ॅम्बुलन्स नागपूर ते मुंबई या मार्गावर उड्डाण करते. नागपूर विमानतळावरील रनवे ३२ वरुन उड्डाण घेत असताना विमानाचं चाक विमानापासून वेगळं झालं आणि खाली कोसळलं होतं अशी माहिती सिविल एविएशन विभागाचे डीजी अरुण कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विमानाचे वैमानिक केशरी सिंह यांनी सांगितले की विमानाचं चाक पडल्याची जाणीव त्यांना झाली. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यापूर्वी आकाशात बराचवेळ घिरट्या घालाव्या लागल्या आणि त्यात बरंच इंधन वाया गेलं. त्यानंतर मी लँडिंग केलं.असं केशरी सिंह यांनी सांगितले