सर्वात वर

नाशिक मध्ये भाजपाच्या वतीने वीज वितरण कंपनी कार्यालयावर जोरदार निदर्शने

नाशिक (प्रतिनिधी) -राज्य सरकारने अनेकदा आश्वासन देऊन देखील नागरीकाना वाढीव वीज बिल माफ करण्याऐवजी वीज जोडणी खंडीत करुन जबरदस्तीने वीज बिल भरण्याकरीता नोटीस पाठवली आहे. या वीज पुरवठा खंडीत करण्याचा  निर्णयाच्या निषेधार्थ महाआघाडी सरकार विरोधात वीज वितरण कंपनीच्या तिगराणीया रोड येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर भाजपा द्वारका मंडलाच्या (Nashik BJP) वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी महाआघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय ढालपे यांना कुलुपाची प्रतिकात्मक प्रतिकृती व निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे (Nashik BJP) जेष्ठ नेते व नामको बँक अध्यक्ष विजय साने यांनी महाआघाडी सरकारने जनतेला वीजबील माफीचा दिलेला शब्द पाळावा अन्यथा यापेक्षा देखील जोरदार आंदोलन भाजपा करेल असा इशारा दिला.

आंदोलनप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते विजय साने,भाजपा द्वारका मंडल अध्यक्ष सुनिल देसाई,सभागृह नेते सतिश सोनवणे,सभापती एड.शाम बडोदे,शहर चिटणीस व नगरसेवक एड.अजिंक्य साने,नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका,अर्चना थोरात,शहिन मिर्ज़ा,सुमन भालेराव,दिपाली कुलकर्णी,मंडल सरचिटणीस उदय जोशी,धनंजय पळशीकर,चंद्रकांत थोरात,राम बडोदे,मिलिंद भालेराव,राजश्री भावसार,तुषार जोशी,सलीम मिर्झा,एस.के.पाळेकर,सन्केत खोडे,निखीलेश गांगर्दे,दत्ता शिंदे आदी.उपस्थित होते.

नाशिक भाजप महानगर तर्फे ४५ हून अधिक ठिकाणी महावितरण विरोधात “टाळा ठोको” व  हल्लाबोल आंदोलन

 वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा यासाठी भाजप नाशिक महानगर (Nashik BJP) तर्फे  ४५ हून अधिक ठिकाणीमहावितरण विरोधात “टाळा ठोको” व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.  सदर आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सुचने नुसार  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे , प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, महापौर सतिष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, जेष्ठ नेते विजय साने, सुहास फरांदे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगूरकर, सुनील केदार, जगन अण्णा पाटील, गणेश गीते,सतिष सोनवणे, जगदीश पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकार, नाशिक रोड मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड, पंचवटी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, तपोवन मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, जुने नाशिक मंडळ अध्यक्ष भास्करराव घोडेकर, द्वारका मंडल अध्यक्ष सुनील देसाई, सिडको मंडळ १ अध्यक्ष शिवाजी बरके, सिडको मंडल २ अध्यक्ष अविनाश पाटील , सातपूर मंडळ अध्यक्ष अमोल इगे देवळाली-भगुर अध्यक्ष मधुसूदन गायकवाड यांचे मार्गदशनखाली  हे आंदोलन पार पडले.